नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल. २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...