पुष्पा : द राईज प्रचंड आशावादी तरीही निराश करणारा चित्रपट!
सध्या पुष्पा : द राईज (पार्ट १) या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. एकूण चार भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी तर नुसता कल्ला केला आहे. पुष्पाच्या ट्रेंडींग गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नर पासून ते हार्दिक पांड्या पर्यंत सर्वांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. यावरूनच पुष्पाच्या लोकप्रियतेने किती मोठे टोक गाठले आहे लक्षात येते. Image source Google एक साधा लाकूड तोडणारा मजूर ते लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख असा सामान्य माणसाच्या यशाचा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात नाविन्यपूर्ण असे काहीच नाही. तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेण्याचे कारण म्हणजे यातील डायलॉग , मसाला, सीन , आणि गाणी. सामाजिक वास्तव दाखवण्यात चित्रपट यशस्वी ठरला असला तरी या वास्तवातून जे सत्य अधोरेखित होते ते भ्रमनिरास करणारेच आहे. पुष्पा (अल्लू अर्जुन) हा या चित्रपटाचा नायक. जो एका वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करतो. जाती-वर्गनिहाय त्...