नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...