It's better to be a single parent than a toxic parent/ वाईट पालक होण्यापेक्षा एकल पालक होणं कधीही श्रेयस्कर!
अमीर खान – किरण राव, (Amir Khan - Kiran Rao) समंथा-नागा चैतन्या (Samantha - Nagachaitanya) आणि आता धनुष-सौंदर्या (Dhanush - Soundarya) अशा प्रसिद्ध कलाकार जोडप्यांनी घटस्फोट (stars who get divorce) जाहीर केल्यानंतर अनेकांनी नाराजी आणि नाखुशी व्यक्त केली. अर्थात आपल्या आवडत्या कलाकार जोडप्यांची अशी ताटातूट होणं चाहत्यांसाठी धक्कादायकच असतं. घटस्फोट म्हटलं की आपल्याकडे लगेचच सगळ्यांचे कान टवकारले जातात. सात जन्म एकत्र राहण्याच्या संकल्पनेचा अजूनही इतका पगडा आहे की, घटस्फोट ही बाब लोकांच्या सहजासहजी पचनी पडत नाही. घटस्फोट असो की लग्न तो त्या दोन व्यक्तींमधला वैयक्तिक प्रश्न आहे असे आपल्याकडे समजलेच जात नाही. लग्न जुळवून देण्यापासून लग्न टिकवून ठेवण्यापर्यंत या प्रवासात फक्त दोघांचं असं काहीच नसतं. एक तर आपल्याकडे प्रेम विवाह खूप कमी होतात. अरेंज मॅरेज मुळे दोघांची ख़ुशी असो किंवा नसो पण कुटुंबियांच्या आनंदासाठी म्हणून कधीकधी अनेक जोडपी तडजोड करताना दिसतात. Image source : Google अशा तडजोडीच्या नात्यात दोघांचीही होणारी घुसमट कुणालाही दिसत नाही आणि त्याबद्दल कुणाला दयाह...