प्रसाद म्हणूनचेन्नईच्या या मंदिरात दिले जाते ब्राऊनी, सँडविच आणि केक....
“समय सबसे बडा जादुगार हैं,”असं म्हटलं जातं ते खरं आहे. काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पाहा ना... कधी काळी टीव्ही पाहण्यासाठी शेजारच्या घरी जाऊन बसावं लागायचं आणि आज टीव्ही आपल्या सर्वांच्या हातात आला आहे. (मोबाईलच्या रुपात हो!) अशा किती तरी बदलेल्या गोष्टी तुम्हालाही जाणवत असतील. पूर्वी देवळात गेल्यानंतर शांतपणे देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुजारी आपल्या हातावर प्रसाद म्हणून साखर, फुटण्याची डाळ, तीर्थ (साधं पाणीच), किंवा लाडू, खोबरं (असं जे काही भाविकांनी देवाला नैवेद्य म्हणून चढवलं असेल तेच) ठेवायचे. पण, आता या प्रथेतही मोठा बदल होऊ पाहतो आहे. jaydurgapeetham.org चेन्नईतील पेडप्पाई भागातील एका मंदिरात चक्क ब्राऊनी, बर्गर, चेरी टोमॅटो सॅलड आणि सँडविच प्रसाद म्हणून वाटला जात आहे. कहर म्हणजे या प्रसादाच्या पाकीटावर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा शिक्का आणि उत्पादन तिथी, एक्सपायरी डेट देखील छापली आहे. पेडप्पाई भागातील जय दुर्गा पिठ्म मंदिरातील फक्त प्रसादाचा मेन्यूच बदलेला नाही तर प्रसाद वाटण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाल...