प्रसंग येतो पण तो घर करून राहत नाही!
आज लीना खूप म्हणजे खूप खुश होती. तिला बढती मिळाली होती. स्वप्न पूर्ण झाले म्हणून लीना खूप म्हणजे खूपच आनंदात होती. आपले बॉस, सहकारी, कार्यालायातील इतर कर्मचारी या सगळ्याबद्दल तिला मनोमन कृतज्ञता वाटत होती. Image Source : Google काही दिवसांनी लीनाचे रुटीन काम सुरु झाले. बढती मिळाली होती म्हणजे अर्थातच जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. कामात ती इतकी बुडाली होती की दुसऱ्या कशासाठी तिला वेळच नव्हता. आपला फोनही तिने दुसऱ्या टेबलवर ठेवून दिला होता, कामात व्यत्यय नको म्हणून. इतक्यात तिला ऑफिसच्या फोनवर एक फोन येतो, आणि तिच्या सासूबाई घरातल्या घरातच पाय घसरून पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे तिला समजते. अर्थातच खूपच गंभीर बाब असल्याने ती आपल्या वरिष्ठांशी याबाबत बोलते आणि ऑफिसमधून बाहेर पडते. बाथरूम मधल्या स्टूलवर बसून पाय स्वच्छ करायला गेल्या आणि स्टूल निसटून तिथल्या तिथे जोरात आपटल्या. तिथल्या तिथे पडल्या असल्या तरी त्यांच्या खुब्याचे हाड मोडले होते आणि त्याचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते. ऑपरेशन नंतरही त्यांना ऊठ-बस करायला जमेल की नाही याची शंकाच होती. आता त्यांच्य...