सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची , कुणाला नोकरीची , कुणाला लग्न होत नाही त्याची , कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात. आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते. वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात - त्यात प्रत्येकात! चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण , हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते. अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात. तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल , त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे , घाम फुटणे , अंग थरथरण...