सबसे बडा रूपय्या-२
पैशाने आनंद विकत घेता येत नाही हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे, की पैशशिवाय आनंदीही राहता येत नाही. पैसा सर्वस्व नसला तरी, आवश्यक तरी नक्कीच आहे. पैशाची उणीव किंवा आवश्यक तितका पैसा हातात नसेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा होतात ही आपण सर्वचजण अनुभवत असतो. Image source : Google पैशाबद्दल आपण चुकीच्या भावना किंवा गैरसमज बाळगल्याने आपल्यापासून पैसा कसा दूर जातो ही आपण मागच्या लेखात पहिलंच आहे. मग हवा तितका पैसा मिळवायचा असेल तर काय करावं लागेल. तर त्यासाठी आधी विश्वास ठेवावा लागेल की, आपल्याला हवा तितका पैसा या जगात उपलब्ध आहे आणि तो आपल्यालाही मिळणार आहे. आपल्याला पैसा मिळणार आहे हा विश्वास ठेवून तुम्ही फक्त ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणत बसायचं नाहीये. तर त्यासाठी तुम्ही जे काम करू शकता, जे कष्ट करू शकता जे प्रयत्न करू शकता तेही करायचेच आहेत. फक्त विश्वास ठेवून नाही तरी विश्वासाने प्रयत्न करूनच आपल्याला आपले इच्छित ध्येय साध्य करता येतं एवढं लक्षात ठेवा. एक मुलगा होता ज्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती. त्याचे वाडीलही उत्तम विनो...