हेल्दी सेक्स लाईफ हेच आनंदी वैवाहिक जीवनाचं गुपित आहे..!

नवरा-बायकोचा नात्यातील अत्यंत महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित मुद्दा म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ. अनेक जोडप्यांमध्ये वरवर तरी सगळं काही छान सुरु असतं मात्र त्यांच्यातील इनर बॉंडिंग हरवलेलं असतं. नात्याला हेल्दी ठेवायचं असेल तर हेल्दी सेक्स लाईफ कशी असली पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. नात्याची सुरुवात करतानाच जर या गोष्टी दोघांनाही माहिती असतील तर तुमचं नातं अजून स्ट्रॉंग, आनंदी होईल. नुकताच संसाराला लागलेल्या नव्या जोडप्यांनी तरी हा लेख आवर्जून वाचा. तुमच्या नातेवाइकांच्या किंवा मित्र-मैत्रिणीच्या लग्नात भलं मोठं गिफ्ट तर तुम्ही दिलंच असेल, आता सुखी संसाराचा राजमार्ग समजावून देण्यासाठी हा लेख त्यांच्याशी जरूर शेअर करा. जोडीदारासोबत सेक्स कसा करावा याबाबत प्रत्येकाची कल्पना ही वेगवेगळी असते. जशी प्रत्येकाच्या भुकेचे प्रमाण, आणि टेस्ट वेगळी अगदी तसच काहीसं याही बाबतीत असतं. प्रत्येकवेळी आपला जोडीदार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकेलच असं नाही. सेक्सच्या बाबतीतील तुमच्या सगळ्याच कल्पना पूर्ण होतील अशा अपेक्षा ठेवू नका. परिपूर्ण सेक्स लाईफ अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. दांपत्य जीवनाचा...