Posts

Showing posts with the label आई होताना

आईपणाची ही दुसरी बाजू माहिती आहे का?

Image
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने अलीकडेच आत्महत्या केली. पेशाने डॉक्टर असलेल्या सौंदर्या यांच्या आत्महत्येमागचे कारण होते नैराश्य. नैराश्याचे ही अनेक प्रकार आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन ( Postpartum Depression) . बहुतांश महिलांना डिलिव्हरी नंतर नैराश्य येते. खरे तर आई होणं म्हणजे आनंदाची पर्वणी. अशा आनंदाच्या क्षणी कुणी निराश कसे राहू शकेल असा प्रश्न निर्माण होत असला तरी हे अनेक महिलांना अशा प्रकारचे नैराश्य सतावते आणि यातून त्यांच्या हातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊलही उचलले जाऊ शकते.   Image source Google पण, पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणजे नेमके काय? ही अवस्था नेमकी कशामुळे निर्माण होते? याची लक्षणे कशी ओळखावीत अशा काही प्राथमिक प्रश्नाबाबत आज या लेखात चर्चा केली जाणार आहे.   डिलिव्हरी नंतर महिलांच्या शरीरात जे हार्मोनल बदल होत्यात त्याचा तर यात मोठा वाटा आहेच पण अचानक बदलेले वेळापत्रक, बाळाशी जुळवून घेण्यात, त्याची देखभाल करण्यात येणाऱ्या अडचणी, जोडीदाराला वेळ न देता येण्याचे दडपण, अशा अनेक कारणांमुळे हे नैराश्य येऊ शकते. ...

संपण्याआधी सावरणे यालाच तर म्हणतात!

Image
स्मिता आज थोडी उशिरा घरी आली. जाताना आपल्याला वेळ होईल किंवा नाही असं काहीच सांगून गेली नव्हती. आल्यावर पण तिने स्वतःपुरता चहा बनवला, प्यायली आणि आपल्या खोलीत निघून गेली. आपण उशिरा आलोय, घरी कुणाला तरी काळजी वाटली असेल, आपण उशिरा आल्याबद्दल काही तरी बोललं पाहिजे यातील काहीच तिच्या गावी नव्हतं. उलट काहीच न झाल्यासारखं आपल्याच नादात होती. कॉलेजहून उशिरा येण्याची तशी ही तिची पहिलीच वेळ होती म्हणा. तरीही आल्या आल्या असं आपल्याच नादात कशी काय गुंग होऊ शकते ही पोरगी? या विचाराने मालतीताईंच्या मनात मात्र थोडी चलबिचल झालीच. Source : Google Image राघव दादा म्हणाले झालं असेल काही तरी थांबली असेल थोडी मैत्रिणीसोबत अर्धा-एक तास उशीर झाला तरी काय बिघडतं? एवढ्याने काय आकाश कोसळलं का लगेच? असं म्हणत त्यांनी मालतीताईंची समजूत घातली. दुसऱ्या दिवशी स्मिता उठली, आपली सगळी कामं आवरली आणि आई जाते गं म्हणत निघून सुद्धा गेली. मालतीताईंना तिच्याशी बोलायचं होतं पण, ती थांबलीच नाही. आज मात्र स्मिता वेळेवर घरी आली. तसही दिवसभर घरातील कामांच्या घाईत त्यांच्या मनातील काळाचा विचार मागे पडला होता. तिच्याशी आपल्य...

आई होताना -१

Image
  समोर क्षितिजा पर्यंत पसरलेला अथांग समुद्र! काठावरच्या त्या छोट्याशा मंदिराच्या पायरीवर बसून मी एकटक त्या समुद्राकडे बघतीये. किती अथांग आहे हा? जिथं पर्यंत नजर पोहोचतेय तिथं पर्यंत फक्त हाच आहे. असे वाटतेय पलीकडच्या किनाऱ्यावरील सूर्य याला अधाशासारखा पिऊन टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि हा त्याला गिळण्याचा! सूर्य याला पिऊ शकत नाही आणि हा सूर्याला गिळू शकत नाही तरीही समोरच्या पटलावरील चित्र बघून माझ्या मनात तरी हीच कल्पना उठली. हळूहळू सूर्य समुद्रात बुडू लागला. या शेवटच्या क्षणीही तो त्याच्या किरणांनी समुद्राच्या लाटांवर नक्षी काढत होता. मजेदार रंग उधळीत होता. तो समुद्रावर त्याच्या उबदार प्रेमाची पखरण करत होता. समुद्र मात्र वेड्यासारखा फक्त किनाऱ्याकडे बेभान होऊन उसळत होता. जणू किनाऱ्यावर त्याची कोणीतरी वाट पाहत असावं. किंवा जणू तो माझ्याकडेच येत असावा. जणू तो मला आत बोलवत असावा. समोर हा दूरदूर पर्यंत पसरलेला समुद्र पाहून माझ्या मनातील कल्पनेचा वारूही त्याच्यासारखाच उधाणला होता. या असीम समुद्रात मिसळून जावं आणि स्वतःही त्याच्यासारखच अथांग व्हावं. जमेल का असं अथांग होणं? पण, मला जमलं तर...

कोण बघल?

Image
  पंधराव्या वर्षी लग्न झालेल्या कविताला फक्त येणा-जाणाऱ्या गाड्यांचा बोर्ड तेवढा वाचता येत होता. पंधराव्या वर्षापर्यंतही अगदी रोजच्या रोज शाळेत जाऊन शिकता  येईल अशी सोय नव्हतीच. घरी चार बहिणी, दोन भाऊ. एवढ्या मोठ्या संसारात प्रत्येकालाच काही ना काही वाटा उचलणं भाग होतं. कवितावर ही घरच्या शेळ्या आणि म्हशींची जबाबदारी होती त्यामुळं शिक्षणाचा श्री गणेशा होऊन तो तेवढ्या वरच थांबला होता. पोरीच्या जबाबदारीतून मोकळं होण्यासाठी आई-वडिलांनी लवकरात लवकर लग्न लावून दिलं. पण, नवरा दारुडा. दोघांचे सतत खटके उडत राहिले. कविता पण काही बसून खाणाऱ्यातली नव्हती. ती पण लोकांच्या शेतात जाऊन भांगलन करायची. दोघांच्या संसाराच सूर जरा कुठ जुळला की नवऱ्याच्या घरचे लगेच त्यात काही ना काही बिब्बा घालायचेच. शेवटी कविता कंटाळून माहेरी आली. नवऱ्याने लाख रुसवा काढायचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती. सासरच्या लोकांचा जाचच एवढा होता की स्वतः कमवून आणलेलं शांत बसून खाताही येत नव्हतं. ती म्हणे, “आपण माझ्या माह्यारात राहू, तू पन मिळेल ते काम धंदा कर आन मी पण करती.” पण, ते नवऱ्याला काही पटत नव्हतं. सासुरवाडीत राह...