आजचा विद्यार्थी दिवस कुणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो आणि का?
आज १५ ऑक्टोंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दूल कलाम यांचा जन्मदिन. आजचा दिवस संपूर्ण जगभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. २००२ ते २००७ या कालावधीत डॉ. कलाम यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. या कालावधीत ते ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जाऊ लागले. Image source : Google त्यांची मेहनत, त्यांची तळमळ, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि दृढनिश्चय या सगळ्या गोष्टी पाहता डॉ. कलाम हे आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी एक मृतीमंत आदर्श आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपला ज्ञान दानाचा वसा सोडला नाही. कर्मरत राहणे म्हणजे काय हे त्यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. असे कलाम सर संपूर्ण जगाला आदर्श वाटतात म्हणूनच संयुक्त राष्ट्राने त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला आहे. डॉ. कलामांना शिक्षकांप्रती खूपच आदर होता. त्यांच्या मते शिक्षकच समाजाची उत्तम बांधणी करू शकतात. विद्यार्थी आणि राष्ट्र उभारण्याची क्षमता ही फक्त शिक्षकांच्यातच असते. डॉ. कलाम हे आजच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही आदर्शच राहतील...