तुमच्या नात्यात (Longterm relationship) या १० गोष्टी असतील तर....!
Source : Google Image व्हॅलेंटाइन विक ( Valentine week) सुरू आहे. प्रेमाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच उतावीळ असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्यामागचा हेतू एकच असतो ते म्हणजे नातं अधिकाधिक फुलवणं! आपल्या आयुष्याचा जोडीदार कायम आपल्या सोबत राहावा असं वाटणं साहजिकच आहे ना? पण, काही नाती अशी शेवटपर्यंत टवटवीत राहत नाहीत. नातं अधिक काळ टिकण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. त्याला वेळ, आपुलकी, संवेदनशीलता, प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, विवेक, समजूतदारपणा, अशा भावनांचे खतपाणी घालावे लागते. ज्या नात्यात या सगळ्या गोष्टी आवश्यक प्रमाणात असतात ते नाते दूरपर्यंत आपल्या सोबत राहते. ज्या नात्याला या गोष्टी मिळत नाहीत, ती लवकरच दम टाकतात. आपली नाती दीर्घकाळ ( long term relationship) टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांमध्येही काही सकारात्मक गुण असणे आवश्यक आहेत. हे दहा गुण जर तुम्हा दोघांमध्येही असतील तर, नक्कीच तुम्ही आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगू शकाल. १) प्रतिक्रिया देणे ( Responsiveness) – ज...