ध्यानाबद्दलचे हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?

सर्वांसाठीच ध्यान करणे फायद्याचे आहेच. त्यातही चिंता, अतिविचार, नैराश्य, निद्रानाश अशा मानसिक विकारांनी ग्रस्त लोकांसाठी ध्यान करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. एकदा ध्यानाला सुरूवात केल्यानंतर ध्यान दिवसातून कितीवेळा आणि कितीवेळ करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. सुरूवात करताना तुम्ही अगदी कमी वेळ घेतला तरी हरकत नाही. हळूहळू तुम्ही ही वेळ वाढवू शकता. अमुक इतका वेळ ध्यान केलं तरच त्याचा फायदा होतो असा काही नियम नाही. ध्यान करण्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमचं सातत्य. सुरुवातीलाच जर तुम्ही फार मोठी अपेक्षा ठेवली तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे म्हणून सुरुवातीला ध्यानामध्ये सातत्य राखणे हेच ध्येय ठेवा. ध्यानातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार लगेच करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने याचे फायदे दिसून येतात. सुरुवातीलाच तुम्ही तास किंवा अर्धा तास तरी ध्यान करणारच असा हट्ट करून बसलात तर तुमचं ध्यान व्यवस्थित होणार नाही आणि त्याचे अपेक्षित परिणाम पण दिसून येणार नाहीत. ध्यान करून झाल्यानंतर तुम्हाला अधिक उत्साही आणि फ्रेश वाटलं पाहिजे. ध्यान सुरू केल्यानंतर अपेक्षित परिणाम लगेच दि...