Just Read - Must Read डिप्रेशन - नैराश्यासारख्या गंभीर आजाराची खोली आणि व्याप्ती समजावून देणारं पुस्तक

सध्याच्या काळात सर्वच पातळ्यांवर जाणवणारी एक भीषण समस्या म्हणजे मनोविकार. त्यातही नैराश्य ( Depression) चं प्रमाण खूप जास्त आहे. एकूण लोकसंख्येपैकी किमान 10% लोकांना तरी या समस्येनं ग्रासलेलं आहे, पण याची तीव्रता अजूनही म्हणावी तशी लक्षात आलेली नाही. अलीकडच्या काळात याचं प्रमाण वाढलं असलं तरी, हा आजार काही नवा नाही. मग याची कारणं काय असू शकतात , याची लक्षणं काय असू शकतात आणि हा आजार केव्हापासून मानवासोबत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर , प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं डिप्रेशन (नैराश्य) हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. Image source - vachan.com नैराश्य म्हणजे काय , त्याची लक्षणं काय , त्याची सुरुवात कशी होते आणि यावर आजवर कोणकोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा विकास कसा झाला, या सगळ्याची सखोल आणि उत्तम माहिती या पुस्तकात दिली आहे. बरेचदा आपल्याला नैराश्य म्हणजे काय? ते कसं असतं आणि ज्या व्यक्तीला या विकारानं घेरलंय त्याची अवस्था कशी असते हेच कळत नाही. ‘काही नाही सगळे मनाचे खेळ आहेत,’ असं म्हणून आपण एखाद्या नैराश्यग्रस्त व्यक्तीला आण...