Posts

Showing posts with the label Uda devi

एकाच वेळी ३० हून अधिक इंग्रज शिपायांचे शिर उडवणाऱ्या उदा देवीची शौर्यगाथा!

Image
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोट्यावधी लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भगतसिंग, राजगुरू सुखदेव, सारखे क्रांतिवीर फासावर चढले. क्रांतिकारी बाबू गेनू सारख्या कित्येकांनी इंग्रजांशी लढता-लढता आपला प्राण त्याग केला, हे तर आपल्याला माहीत आहेच. पण, याच संग्रामातील काही कथा आणि व्यक्ति अशाही आहेत ज्यांची इतिहासाने पुरेशी दखल घेतलेली नाही. आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ३० पेक्षा जास्त ब्रिटीश सैनिकांना धारातीर्थी पडणाऱ्या उदा देवी पासी या विरांगणेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कदाचित फक्त मोजक्या लोकांनाच याची माहिती असेल बहुतांश लोकांना नाही. धाडस, शौर्य, जिद्द, जोश आणि पराक्रम यांची धगधगती ज्वाला म्हणजे उदा देवी! उदा देवीच्या पराक्रमाची ही गाथा वाचल्यानंतर तुमचे रक्तही सळसळल्या शिवाय राहणार नाही.   Image source : Google तो काळ होता १८५७ चा. भारतात सर्वत्रच ब्रिटीश विरोधी रोष शिगेला पोहोचला होता. विविध संस्थानिकांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाच्या मनात ब्रिटीश विरोधी असंतोष खदखदत होता. ठिकठीकाणच्या संस्थानातून ब्रिटिशांच्या विरोधात मोहीम छेडली जात होती. या उठवात स्त्रियाही पुढे ...