तुमच्या नात्यात या गोष्टी असतील तर तुमच्या जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आणखी दृढ होऊ शकतं.

नात्यात वाद-विवाद , मतभेद, रुसवे फुगवे, राग हे होतंच राहतं. या सगळ्या दुविधांच्या पलीकडे जाऊन नातं अधिक दृढ आणि बळकट करायचं असेल तर नात्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागतो. जोडीदाराशी जुळवून घेणं, त्याला समजून घेणं, त्याला वेळ देणं, एकमेकांच्या अडचणी , समज गैरसमज शेअर करणं , त्याबद्दल बोलणं , एकमेकांना मदत करणं , मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुखी संसारासाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आर्थिक स्थैर्य, समाजिक प्रतिष्ठा , मान्यता यांच्याही पलीकडे नात्यात दोघांच एक वेगळं जग असतं. हे जग सुंदर करण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात. आता बघूया नातं सुंदर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरतील. लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टींसाठी एकमेकांच्या व्यस्त दिनक्रमातून काही खास वेळ काढणं गरजेचं आहे. आणि हा खास वेळ फक्त याच कामासाठी वापरायचा, हे लक्षात राहणंही गरजेचं आहे. नातं टिकवणं ही कुणा एकट्याची जबाबदारी नसते. यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच ओढ असायला लागते. डेटिंग – अतिशय मस्त आणि मस्ट अशी ही कल्पना आहे. मुव्ही किंवा डिनर डेट या कल्पना चांगल्याच आहेत. पण याव्यतिरिक्त तुम...