मी आणि माझी दुनिया 😁
.jpg)
लहान असताना मला असं वाटायचं की या एकाच जगात दोन ✌️ दुनिया आहेत. एक वाली जिथे आपण राहतो आणि दुसरी सेम तू सेम अशीच पण कुठे आहे आपल्याला माहीत नाही. तर माझी कल्पना इथेच थांबली नाही, त्या माहीत नसलेल्या दुनियेबद्दल माझे विचार काही असे होते – इथली जी दुनिया आहे ज्यात आपण राहतो त्यापेक्षा ‘ती’वाली दुनिया खूप चांगली असणार आणि तिथे चांगले लोक असणार. तिथे एक चांगली ‘मी’पण असणार. म्हणजेच हुबेहूब माझीच प्रतिकृती पण, ती माझ्यापेक्षा चांगली असणार.🙄 तिला कधीच कुणीच ओरडत नसणार. 🤗 तर माझा असा प्लान होता की, मी या दुनियेतून त्या दुनियेत 🌞 जावं आणि त्या चांगल्या वाल्या माझ्या प्रतिकृतीला इथे पाठवावं आणि मी तिथेच चांगल्या दुनियेत राहावं. पण, त्या दुनिये पर्यंत जायचं कसं हेच माहीत नसल्यानं काही दिवसांनी मी ही कल्पना सोडून दिली आणि आहेत त्याच दुनियेत राहायचं असं ठरवून टाकलं. पण, एकाच वेळी दोन समान जग असू शकतात असं मला का वाटत होतं कुणास ठाऊक. 🤔 त्या दुनियेत जे काय घडेल ते समजून घेण्याचा कुठला ना कुठला मार्ग आपल्याला कधी ना कधी सापडेल असंही वाटायचं. त्यानंतर काळाच्या ओघात कधी तरी माझी ही समांतर दुन...