ध्यान करण्यासाठी गंभीर होण्याची काय गरज?

ध्यान, मेडिटेशन, माइंडफुलनेस किंवा जागरूकता असे शब्द वाचनात किंवा ऐकण्यात आले तर आपल्याला वाटते की यासाठी आपल्याला खूपच गंभीर होऊन जगावं लागेल किंवा यागोष्टी म्हणजे एक फार मोठे गूढ आहे. अर्थात या गोष्टी सहज शक्य नाहीत असा आपला समज असल्याने आपल्याला असे वाटते की, ध्यान करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी खास वेळ काढावा लागतो आणि अशा व्यक्तिमध्ये खूप मोठा बदल होतो. Image Source : Google तुम्हालाही असे वाटत असेल तर, हा एक गैरसमज आहे. मेडिटेशन म्हणजे खूप काही गंभीर प्रकार नाही. अगदी रोजची दैनंदिन कामे करता करताही आपण मेडिटेशन करू शकतो. असं मी नाही तर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रसेल ब्रॅंडचे मत आहे. त्याच्या मते मेडिटेशन केल्याने आणि माइंडफुलनेसचा सराव केल्याने, मनात येणारे विचार आणि भावना यांच्याकडे तटस्थतेने पाहण्याची कला मिळाली. माइंडफुलनेसचा हसतखेळत सहजतेने अनुभव कसं घ्यावा ही संगण्यासाठी त्याने स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला आहे. माइंडफुलनेस किंवा मेडिटेशनल सुरुवात केल्याने आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवता येतो. बाहेरच्या कोलाहलातही शांतता मिळते. त्यामुळे ...