उठा,लिहा, बोला, आज संपूर्ण जग तुम्हाला ऐकायला उत्सुक आहे!
Image source : Google युवा म्हणजे कोण ? देश, समाज, कुटुंब, शहर यांच्या भल्यासाठी, उन्नतीसाठी, झटणारा तो युवा! ज्याच्याकडे बल आणि युक्ती यांचा संगम आढळतो तो म्हणजे युवा! भविष्याची कमान आणि भूतकाळाचे संचित ज्याला सांभाळायचे आहे तो म्हणजे युवा! अशा या युवावर्गाच्याही स्वतःच्या काही समस्या असू शकतात. त्यांच्या स्वविकासात अडचणी येऊ शकतात. नवनव्या संकल्पना साकारताना, त्या संकल्पना अंमलात आणताना या युवावर्गाला काही अडथळे पार करावे लागतात. त्यांच्यातील संघर्षशील वृत्तीला, सर्जनशीलतेला, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील समस्या जाणून घेऊन त्यांना हिंमत देण्यासाठी जगभर १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाय, जगभरातील ही युवाशक्तीच बदलाची कारक आहे, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. देशाची आणि समाजाची प्रगती ही त्या देशातील आणि समाजातील युवकांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे. त्यांना देशासाठी समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेतली गेली पाहिजे, वेगवेगळ्या देशातील युवकांनी सम...