Posts

Showing posts with the label health

कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!

Image
कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) म्हणजे काय ? CBT चे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून! आपली विचार करण्याची पद्धती , आपले अनुभव त्यातून आपण काढलेले निष्कर्ष , आपल्या श्रद्धा-भावना-दृढविश्वास , यांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. विचार , भावना यात काही   बिघाड निर्माण झाल्यास आपले मानसिक संतुलन बिघडते. मग विचार आणि भावनांतील हे संतुलन राखण्यासाठी काय करता येईल ? मानसिक तणाव , नैराश्य , निद्रानाश ,   Anxiety, mood swings अशा मानसिक, भावनिक समस्यांवर उपाय करण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ जी पद्धत वापरतात ती म्हणजे   कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . आज आपण या प्रभावी पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या विचारातील , भावनांमधील नकारात्मकता शोधून तिच्यावर सकारात्मक काम करण्याचे तंत्र म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . या तंत्रामुळे आपण आपले विचार , भावना तर सोडाच पण वर्तन देखील बदलू शकतो. पण यासाठी खूप कष्ट घेण्याच...

सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

Image
आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची , कुणाला नोकरीची , कुणाला लग्न होत नाही त्याची , कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात. आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते. वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात - त्यात प्रत्येकात!   चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण , हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते. अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात. तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल , त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे , घाम फुटणे , अंग थरथरण...

तणाव हाताळण्याच्या काही प्रभावी पद्धती!

Image
दररोजच्या थकवा आणणाऱ्या रुटीन कामापासून ते अचानक उभ्या राहिलेल्या एखाद्या संकटामुळे आपल्याला तणाव जाणवतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी कामे अशी असतात ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकवा येतो. हा थकवा किंवा हा तणाव कमी करण्यासाठी आवर्जून वेळ दिला नाही तर तो वाढत जातो आणि एखाद्या दिवशी याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.  आपण नेहमीच बाह्य परिस्थितीवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. पण मनस्थिती जर नीट हाताळता आली तर येणारा तणाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शारीरिक-मानसिक गुंतागुंत आपण नक्कीच टाळू शकतो. तणाव तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. अतिरिक्त तणावामुळे तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीवरील ताण  हलका करणं खूपच गरजेचं आहे. या लेखात आपण तणाव हाताळण्याच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनाचा आनंद घेऊ शकाल आणि तणावाच्या गंभीर परिणामापासून स्वतःला दूर ठेऊ शकाल. आता तणाव निवळण्यासाठी प्रत्येकाला एकच मात्रा लागू होईल असे नाही. प्रत्येकाला येणाऱ्या तणावाचे कारण ...

दुपारची पेंग टाळण्यासाठी या ट्रिक वापरून पहिल्यात का?

Image
सकाळी उठून आवरल्यानंतर आपण ऑफिससाठी बाहेर पडतो. सकाळी सकाळी दिवसाची चांगली सुरुवात झालेली असते. आज ऑफिसमधील कामं अजिबात रेंगाळत ठेवायची नाहीत... असा निश्चय केलेला असतो. लंचब्रेक होईपर्यंत हा उत्साह आणि निश्चय अगदी नेटाने रेटत नेलेला असतो. दुपारी लंचब्रेक झाला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली की या उत्साहाच्या फुग्यातली हवा हळूहळू कमी व्हायला लागते. डोळे अपोआप जड होऊ लागतात. इतके जड होतात कधी मिटतात हे आपल्यालाच कळत नाही. दुपारची ही पेंग कितीही नकोशी असली तरी, ती आपला पिच्छा पुरावाल्याशिवाय राहत नाही. काम करण्याचा उत्साह अगदी मावळून गेलेला असतो आणि एक छानशी डुलकी काढण्याचा मोह अनावर होतो. पण ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अशी डुलकी घेण्याची परवानगी नसते त्यामुळे अगदी नाईलाजाने आपण स्वतःला जुंपून घेतो. एखाद दिवस असं झालं तर ठीक पण, जर हेच रुटीन राहिलं तर याचा तुमच्या परफॉर्मन्सवर आणि एकूणच आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. दुपारचीही झोप टाळण्यासाठी काय करता येईल याचा कधी विचार केलाय का? नसेल तर इथे दिलेल्या काही टिप्स फॉलो करता येतात का पहा... याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दिवसा आनाहुत...

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...

तुम्हालाही संताप अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल?

Image
तुम्हालाही संताप (chronic anger) अनावर होतो? तो आवरण्यासाठी काय कराल?  भावना प्रत्येकाला असतात. अगदी प्राण्यांनाही. प्रत्येक माणूस भावनिक असतो. भावनांच्या एकत्रीकरणातूनच माणसाचं व्यक्तीमत्व तयार होत असतं. आपण अनेकदा माणसाचं वर्णन त्याच्यातील प्रबळ भावनेवरूनच करतो, तो रागीट आहे, ती प्रेमळ आहे, तो हसरा आहे, ती बोलकी आहे, वगैरे... पण अनेकदा भावनांचा तोल सांभाळता आला नाही की, याच भावना विकृतीच्या रुपात आपल्यात घर करून राहतात. ही वकृती कधी आपला ताबा घेते ते लक्षातही येत नाही. भावना प्रत्येकाला व्यक्त करता येत नाहीत. एखादी गोष्ट मनात दीर्घकाळ सलत राहिली की, तिचे रुपांतर रागात होते. काही लोकांना राग पटकन येतो,   कारण ही एकमेव अशी भावना आहे जी दबली जात नाही किंवा इतर दबलेल्या भावना याच रुपात उफाळून येतात.   काही व्यक्तींच्या मनात अशा दबलेल्या भावनांनी इतके घर केलेले असते की, त्या व्यक्ति सतत चिडचिड करत राहतात. त्यांच्या मनात संताप धुमसत राहतो. हा संताप कधी एखाद्या प्रसंगाबाबत असतो तर, कधी एखाद्या व्यक्तीबाबत. राग किंवा संताप ही एक नकारात्मक भावना आहे. या भावनेचा त्रास जित...

आरोग्याला हितकारक असे हे चहाचे प्रकार कधी ट्राय केले आहेत का?

Image
पावसाळा सुरु झाला आहे आणि अशा या थंड मौसमात जास्त आठवण येते ती म्हणजे चहाची. पावसाळ्यात पिला जाणारा हा चहा थोडा आयुर्वेदिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असेल तर मग काय मज्जाच! पावसाचा हा ऋतू हवाहवासा असला तरी या ऋतूमध्ये पावसासोबतच काही आजारही आपला पिच्छा पुरवतात. या दिवसात सर्दी, ताप, पडसे अशा किरकोळ आजारासोबतच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे काही गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी विशेषत: सर्दी/पडसे/खोकला अशा किरकोळ आजारापासून सुटका मिळावी म्हणून आम्ही इथे चहाचे काही खास प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ज्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही सुधारेल आणि मूडही! lokmat.com १)तुळस-आले चहा ( Ginger-basil leaves tea/tulas-aale chaha) – एका भांड्यात तीन कप पाणी घ्या. त्यात एक चमचा खिसलेले आले टाका. त्यानंतर १०-१२ तुळशीची पाने टाका. ५ मिनिटासाठी हे मिश्रण उकळा. उकळून झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि चहा सर्व्ह करा. चहाला थोडी गोडी येण्यासाठी एक चमचा मध देखील मिसळू शकता. हा चहा तुमची पचनशक्ती सुधारण्यात म...