कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!

कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) म्हणजे काय ? CBT चे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून! आपली विचार करण्याची पद्धती , आपले अनुभव त्यातून आपण काढलेले निष्कर्ष , आपल्या श्रद्धा-भावना-दृढविश्वास , यांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. विचार , भावना यात काही बिघाड निर्माण झाल्यास आपले मानसिक संतुलन बिघडते. मग विचार आणि भावनांतील हे संतुलन राखण्यासाठी काय करता येईल ? मानसिक तणाव , नैराश्य , निद्रानाश , Anxiety, mood swings अशा मानसिक, भावनिक समस्यांवर उपाय करण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ जी पद्धत वापरतात ती म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . आज आपण या प्रभावी पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या विचारातील , भावनांमधील नकारात्मकता शोधून तिच्यावर सकारात्मक काम करण्याचे तंत्र म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . या तंत्रामुळे आपण आपले विचार , भावना तर सोडाच पण वर्तन देखील बदलू शकतो. पण यासाठी खूप कष्ट घेण्याच...