Posts

Showing posts with the label Motivatiion

सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

Image
आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची , कुणाला नोकरीची , कुणाला लग्न होत नाही त्याची , कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात. आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते. वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात - त्यात प्रत्येकात!   चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण , हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते. अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात. तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल , त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे , घाम फुटणे , अंग थरथरण...

ध्यान करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या!

Image
Image source : Google  ध्यान म्हणजे काय याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. काही लोकांसाठी तर ध्यान म्हणजे आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट वाटते. काही लोकांना ध्यान म्हणजे एखादी गूढ क्रिया वाटते. परंतु वास्तवात ध्यान ही एक सहज सुंदर गोष्ट आहे.  या लेखातून आपण ध्यान म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. ध्यान कोणकोणत्या प्रकारे करता येते आणि त्याचे फायदे काय आहेत हेही पाहू.  सरळ सोप्या भाषेत सांगायचे तर ध्यान म्हणजे विचार, चिंतन किंवा आपल्या भावनांचे परीक्षण करणे. खरे तर आपण बरेचदा नकळत या गोष्टी करत असतोच. पण, जाणीवपूर्वक आणि शक्य तितक्या तटस्थपणे आपल्या विचारांचे, भावनांचे परीक्षण करणे म्हणजे ध्यान असे म्हणता येईल. ध्यान करण्याची विशिष्ट पद्धती आहे का? खरे तर ध्यानाचा अमुक एक मार्गच बरोबर आणि दुसरा चुकीचा असं काही म्हणता येणार नाही. तुम्हाला ज्या मार्गाने ध्यान करणे आवडेल आणि ज्या पद्धतीने ध्यान केल्याने तुमच्या मानसिकतेत फरक पडेल तो मार्ग, ती पद्धत तुम्ही बिनधास्तपणे स्वीकारू शकता.  एका ठिकाणी मांडी ठोकून, डोळे झाकून बसणे म्हणजेच ध्यान असं अजिबात नाही.  जगातील प्रत्येक...

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...

मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)

Image
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती| प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला ( Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून ( University of Kentucky)   पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. indiatimes.com हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत. मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठा...

कनिका टेकरीवाल, अवघ्या ३२व्या वर्षी कोट्यावधींची उलाढाल करणारी बिझनेसवूमन! /Kanika Tekariwal

Image
मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नाही होता, हौसलों सें उडान होती है| स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी असतात तेव्हाच वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते म्हणून तर वयाच्या २१ व्या वर्षी कॅन्सरला हरवून २२ व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरु करणारी कनिका टेकरीवाल आज इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. आज जिकडे तिकडे कनिकाचीच चर्चा दिसते आहे. अर्थातच तिची झेपच इतकी उंच आहे की, चर्चा तर होणारच! google image अवघ्या ३२ व्या वर्षी दहा प्रायव्हेट जेट जिच्या नावावर आहेत ती कनिका आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जगातील १०० श्रीमंत महिलांच्या यादीत तिने आपले स्थान निर्माण केले आहे आणि हे करत असताना वाटेतील प्रत्येक अडथळ्यावर तिने यशस्वी मात केलेली आहे.   एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी आज गाडी, रेल्वे,बस असे कित्येक पर्याय आहेत. त्यातही अति वेगवान पर्याय कुठला तर प्रायव्हेट जेट! पण, हा पर्याय किती लोकांच्या आवाक्यातला आहे? अगदी थोड्या. त्यातही ज्यांना हा पर्याय परवडतो त्यांनाही यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. प्रायव्हेट जेटने प्रवास करण्यासाठी ...

World's top coder ठरलेला कलश गुप्ता आणि त्याची अभिमानास्पद कामगिरी... !! वाचा तरी नक्की त्याने काय केलंय?

Image
भारताला बौद्धिक संपदेची परंपरा आहे. आजवर अनेक भारतीयांनी जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे. विज्ञान असो की कला भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीच्या कलश गुप्तानेही भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवून ही परंपरा कायम राखली आहे.   dnindia.com दिल्ली आयआयटीमध्ये इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कलश गुप्ताने जगातील पातळीवर भारावल्या जाणाऱ्या कोडींग स्पर्धेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे टीसीएस कोडव्हिटा ( TCS-CodeVita season 10) ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. ८७ देशातून एक लाख स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या एक लाख स्पर्धकांना मागे टाकत कलशने या स्पर्धेत आपला विजय नोंदवला आहे.   आयआयटी दिल्लीत शिकणाऱ्या कलशने JEE ( Engineering Entrance Exam/Joint Entrance Exam) परीक्षेतही संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक पटकावला होता. दिल्ली विभागातून तो प्रथम आला होता.   कलशने या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले असून या स्पर्धेत दुसऱ्य...

काहीही न करता बसून रहाणं सुद्धा खूप मोठं काम आहे!

Image
कधी कधी सकाळी अंथरुणातून उठावंच वाटत नाही. कुठलंच काम करायला नको दिवस फक्त असाच निवांत असावा...असं वाटणं साहजिक नाही का? दररोज उठून आपण आपलं रुटीन धावपळीचं आणि प्रचंड धकाधकीचं जीवन जगतच असतो. त्यातून एखादा दिवस असा काहीही न करता घालवावासा वाटणं स्वाभाविक आहे. रोजच्या त्याच त्याच कामाचा कंटाळा येणं ही सामान्य बाब आहे. पण, आपल्याला कामाची इतकी सवय झालेली असते की, काहीही न करता कसं बसायचं? हेच कळत नाही. किंवा आपण बसून राहिलो तर अंगात आळस भरेल, शिवाय कामं तर केलीच पाहिजेत ना? त्याला पर्याय नाही असं म्हणत आपण स्वतःला रेटत नेतो. स्वतःवरच कामाची सक्ती करत राहतो. एखादा दिवस असं स्वतःला अजिबात जबरदस्ती न करता मस्त लोळत काढला जाऊ शकत नाही का? खरं तर हा प्रश्न बायकांना विचारायला हवा. कारण, असा एखादा दिवस त्याच्या नशिबी येणं म्हणजे स्वर्गीय सुखच. नाही का! रोजच्या कामातून सुट्टी ही हवीच. आपल्या शरीराला आणि मनालाही. काहीही न करू वाटणं, म्हणजे आपल्या शरीरानं आणि आपल्या मनानं पुकारलेलं बंडच असतं. अशावेळी काहीही न करता राहणं ही अवघड आणि काही करणं ही अवघड अशी द्विधा अवस्था होते आणि ती ठीक आहे.   ...

तुमच्या नात्यात (Longterm relationship) या १० गोष्टी असतील तर....!

Image
Source : Google Image  व्हॅलेंटाइन विक ( Valentine week)   सुरू आहे. प्रेमाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच उतावीळ असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीविषयीच्या भावना व्यक्त करण्यामागचा हेतू एकच असतो ते म्हणजे नातं अधिकाधिक फुलवणं!   आपल्या आयुष्याचा जोडीदार कायम आपल्या सोबत राहावा असं वाटणं साहजिकच आहे ना? पण, काही नाती अशी शेवटपर्यंत टवटवीत राहत नाहीत. नातं अधिक काळ टिकण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. त्याला वेळ, आपुलकी, संवेदनशीलता, प्रेम, विश्वास, एकनिष्ठता, विवेक, समजूतदारपणा, अशा भावनांचे खतपाणी घालावे लागते. ज्या नात्यात या सगळ्या गोष्टी आवश्यक प्रमाणात असतात ते नाते दूरपर्यंत आपल्या सोबत राहते. ज्या नात्याला या गोष्टी मिळत नाहीत, ती लवकरच दम टाकतात.   आपली नाती दीर्घकाळ ( long term relationship) टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर, तुमचा जोडीदार आणि तुम्ही दोघांमध्येही काही सकारात्मक गुण असणे आवश्यक आहेत. हे दहा गुण जर तुम्हा दोघांमध्येही असतील तर, नक्कीच तुम्ही आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगू शकाल.   १) प्रतिक्रिया देणे ( Responsiveness) – ज...

झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टची डिझायनर हेड शाहीन अत्तारवालाचा हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल!

Image
‘इच्छा तेथे मार्ग,’ हा सुविचार तुम्ही अनेकदा ऐकला , वाचला असेल. पण , या सुविचाराचा खरा अर्थ जर तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर मायक्रोसॉफ्टची प्रोडक्ट डिझायनर असणाऱ्या शाहीन अत्तारवालाची ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे.   Image source Google मुंबईच्या झोपडपट्टीत जन्माला आलेल्या शाहीनने मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रथितयश कंपनीत जे स्थान मिळवले आहे , ते अचंबित करणारे आहे.   मुंबई शहराला स्वप्ननगरी म्हटलं जातं आणि हे खरंही आहे. डोळ्यात स्वप्नं घेऊन येणाऱ्या आणि स्वप्नांसाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी असणाऱ्या लोकांना हे शहर कधीच निराश करत नाही. शाहीनच्या लहानपणी तिचे वडीलही असेच चांगल्या जीवनाची स्वप्नं डोळ्यात घेऊन मुंबईत आले होते. शाहीनचा सुरुवातीचा काळ बांद्रा रेल्वे स्टेशन शेजारच्या एका झोपडपट्टीत गेला. या झोपडपट्टीने तिला जीवनाची काळी बाजू दाखवून दिली. खूप लहान वयात तिने जीवनाचे विदारक चित्र पहिले होते. झोपडपट्टीत जिथे सार्वजनिक संडासांचीही सोय नव्हती अशा ठिकाणी जी लहानाची मोठी झाली तिने काय काय पहिले असेल अनुभवले असेल याची कल्पनाच केलेली बरी.   आजूबाजूच्या स्त्...