नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

नात्यातील Red flags बद्दल हल्ली सगळीकडेच चर्चा होताना दिसते. पण Red flags म्हणजे नक्की काय ? ते कसे ओळखायचे आणि Red flags सह नातं टिकवता येतं की नात्यातून बाहेर पडणं हाच एक उपाय असतो ? जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. लाल रंग म्हणजे धोक्याचं प्रतिक. त्याच अर्थानं नात्यात Red flags हा शब्द वापरला जातो. ट्रॅफिकचा red सिग्नल लागल्यावर आपण थांबतो , तसंच नात्यातही आपल्याला काही सिग्नल मिळतात. जे सांगतात की, हे नातं आपल्यासाठी चांगलं ठरणार नाही. मुळात एकदा नातं जोडलं की , ते जन्मोजन्मी टिकवण्याच्या आपल्या संस्कृतीत नात्यातील Red flags बद्दल बोललं जाणं हीच मोठी क्रांती आहे. कारण आपला सगळा खटाटोप नातं टिकवण्यासाठी , वाचवण्यासाठीच चाललेला असतो. पण हल्ली नात्याच्या बाबतीतही आपला दृष्टीकोन बदलत आहे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. एखाद्या व्यक्तीला नात्याचं महत्वच कळत नसेल , तर अशा व्यक्तीसोबत दीर्घकाळ नात्यात राहिल्याने आपल्या शारीरिक , मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. शिवाय करिअर , आर्थिक स्थैर्य , जीवनातील आनंद, समाधान यांनाही सुरुंग लागतो. एका नात्याचा परिणाम इतर...