आयुष्य फक्त काटेच वाट्याला देतं असं नाही, कधीकधी फुलंही देतं!

लिहू की नको असा विचार करत होते पण लिहीतेच. आयुष्य कधीकधी क्रूर चेष्टा करतं तसंच ते कधीकधी आपल्याला भरभरून देतही असतं, यावर विश्वास बसावा म्हणून लिहिण्याचा हा अट्टाहास! आयुष्याने दिलेली संधी एकदा डोळसपणे पाहता आली पाहिजे बस्स! कौन्सिलिंगसाठी अनेक फोन येत असतात. मेसेज येत असतात , यात काही खरंच खूप गरजू असतात , काही लोकांना फक्त टाईमपास करायचा असतो. कालही असाच एक फोन आला. कौन्सेलिंग घ्यायची आहे. मी फी घेऊन कौन्सिलिंग करते म्हटल्यावर, त्या मुलीने फोन ठेवला. पुन्हा अर्ध्या तासांनी तिचा मेसेज आला, फी किती घेता? मी तिला आकडा सांगितल्यावर ती पुन्हा गप्प झाली. तिने परत फोन केला आणि म्हणाली, तुम्ही काही कमी नाही का करू शकत फी मध्ये ? मी म्हटलं तू किती देऊ शकतेस तितके दे. पण यावेळी मी तिची थोडी चौकशी केली, “कशासाठी घ्यायचं आहे कौन्सेलिंग ? ” “डिप्रेशनसाठी , ” तिचं उत्तर. जरा सविस्तर सांगशील का? म्हटल्यावर , तिने सांगितलं, “माझा साखरपुडा झालाय आणि पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. पण माझ्या पास्टचे काही इस्स्यू आहेत, ज्यातून मला बाहेर पडता येत नाहीये.” मला वाटलं असेल काही, तरी प्रेमप्रकरण आण...