Posts

Showing posts with the label Self care

कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी (Cognitive behavioral therapy) म्हणजे काय? CBTचे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून!

Image
कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) म्हणजे काय ? CBT चे प्रकार आणि ही थेरपी कोणकोणत्या समस्यांवर उपयोगी ठरते, पाहूया या लेखातून! आपली विचार करण्याची पद्धती , आपले अनुभव त्यातून आपण काढलेले निष्कर्ष , आपल्या श्रद्धा-भावना-दृढविश्वास , यांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो. विचार , भावना यात काही   बिघाड निर्माण झाल्यास आपले मानसिक संतुलन बिघडते. मग विचार आणि भावनांतील हे संतुलन राखण्यासाठी काय करता येईल ? मानसिक तणाव , नैराश्य , निद्रानाश ,   Anxiety, mood swings अशा मानसिक, भावनिक समस्यांवर उपाय करण्यासाठी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ जी पद्धत वापरतात ती म्हणजे   कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . आज आपण या प्रभावी पद्धतीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्या विचारातील , भावनांमधील नकारात्मकता शोधून तिच्यावर सकारात्मक काम करण्याचे तंत्र म्हणजे कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी ( Cognitive behavioral therapy) . या तंत्रामुळे आपण आपले विचार , भावना तर सोडाच पण वर्तन देखील बदलू शकतो. पण यासाठी खूप कष्ट घेण्याच...

सतत सतावणाऱ्या चिंतेवर काय उपाय करू शकतो? कधी विचार केला आहे का?

Image
आयुष्यात प्रत्येकालाच कशा ना कशाची चिंता लागून राहिलेली असते. कसलीच चिंता नाही असा मनुष्य शोधूनही सापडणार नाही. कुणाला शिक्षणाची , कुणाला नोकरीची , कुणाला लग्न होत नाही त्याची , कुणाचं कुटुंबीयांसोबत पटत नाही त्याची. दररोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या चिंतेत नवी भर टाकत असतात. आज ऑफिसमध्ये कुणी काही बोललं. घरात वाद झाले. आर्थिक फटका बसला. व्यवसायात कुणी फसवणूक केली. अशा मोठ्या घटना तर पार आपल्याला हादरवून टाकतात तेव्हा चिंता वाढते. वाढलेली ही चिंता सावलीसारखी आपल्या पाठीशी चिकटून राहते. मग जिथे जाईल तिथे आपल्याला चिंता दिसायला लागते. यात - त्यात प्रत्येकात!   चिंता किंवा काळजी वाटणं ही तशी फार सामान्य गोष्ट आहे. पण , हीच चिंता जेव्हा पाठ घेते तेव्हा मात्र ती फक्त एक भावना न राहता रोग बनून जाते. अति तिथे माती होतेच. अति चिंता जेव्हा तुमच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते, तुमच्या दैनंदिन कामात लुडबुड करते, तुमचा ताबा घेते, तेव्हा तिला Anxiety disorder म्हणतात. तुम्हाला नेहमीच कशा ना कशाची चिंता वाटत असेल , त्यामुळे तुम्हाला भीती वाटणे , घाम फुटणे , अंग थरथरण...

तुमच्या नात्यात या गोष्टी असतील तर तुमच्या जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आणखी दृढ होऊ शकतं.

Image
नात्यात वाद-विवाद , मतभेद, रुसवे फुगवे, राग हे होतंच राहतं. या सगळ्या दुविधांच्या पलीकडे जाऊन नातं अधिक दृढ आणि बळकट करायचं असेल तर नात्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागतो. जोडीदाराशी जुळवून घेणं, त्याला समजून घेणं, त्याला वेळ देणं, एकमेकांच्या अडचणी , समज गैरसमज शेअर करणं , त्याबद्दल बोलणं , एकमेकांना मदत करणं , मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुखी संसारासाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आर्थिक स्थैर्य, समाजिक प्रतिष्ठा , मान्यता यांच्याही पलीकडे नात्यात दोघांच एक वेगळं जग असतं. हे जग सुंदर करण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात. आता बघूया नातं सुंदर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरतील. लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टींसाठी एकमेकांच्या व्यस्त दिनक्रमातून काही खास वेळ काढणं गरजेचं आहे. आणि हा खास वेळ फक्त याच कामासाठी वापरायचा, हे लक्षात राहणंही गरजेचं आहे. नातं टिकवणं ही कुणा एकट्याची जबाबदारी नसते. यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच ओढ असायला लागते. डेटिंग – अतिशय मस्त आणि मस्ट अशी ही कल्पना आहे. मुव्ही किंवा डिनर डेट या कल्पना चांगल्याच आहेत. पण याव्यतिरिक्त तुम...

नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!

Image
  दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात. आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला ...

नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

Image
आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...

स्वतःवरही भरपूर प्रेम करू शकतो आपण! या Valentine ला स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा!

Image
प्रेमाचा आठवडा सुरु आहे. प्रेमाच्या या प्रवासाची सुरुवात होते ती स्वतःपासून आणि स्वतःवरील प्रेमाची सुरुवात होते आत्म-स्वीकारापासून. पण स्वतःचा स्वीकार म्हणजे तरी काय? स्वतःला आहोत तसं स्वीकारणं म्हणजे आत्म-स्वीकार. हे वाक्य वाचायला जितकं सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात अवलंबायला कठीण! मुळात आपण कसे आहोत हेच बरेचदा आपल्याला माहीत नसतं.  मग हा प्रवास स्वतःला ओळखण्यापासून सुरू व्हायला हवा. एकदा का स्वतः आपण कसे आहोत कसे नाही हे कळालं की, मग ते स्विकारणं सोपं होईल नाही का? बरेचदा इतरांनी दिलेले शेरे, कौतुक, मान अपमान याच चष्म्याने आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते. पण, मुळात आपण कसे आहोत, कसे होतो? हेच कधी कधी विसरून गेलेलं असतं. असे इतरांनी दिलेली मतं आपण आपल्यावर लादली आहेत का हेही पाहायला हवं. कधी कधी अशी मतं न कळत आपल्यात रुजलेली असतात, आपण ती स्वीकारलेली असतात. स्वतःला स्वीकारताना, अशी लादलेली प्रतिमा नाकारताही यायला हवं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा आपण स्वतःला ओळखलं, एकदा स्वीकारलं आणि बस्स आता आपण स्वतःच्या प्रेमात पडलो असं होत नाही. तुमचं दुसऱ्याशी असलेलं ना...

दुपारची पेंग टाळण्यासाठी या ट्रिक वापरून पहिल्यात का?

Image
सकाळी उठून आवरल्यानंतर आपण ऑफिससाठी बाहेर पडतो. सकाळी सकाळी दिवसाची चांगली सुरुवात झालेली असते. आज ऑफिसमधील कामं अजिबात रेंगाळत ठेवायची नाहीत... असा निश्चय केलेला असतो. लंचब्रेक होईपर्यंत हा उत्साह आणि निश्चय अगदी नेटाने रेटत नेलेला असतो. दुपारी लंचब्रेक झाला आणि पुन्हा कामाला सुरुवात झाली की या उत्साहाच्या फुग्यातली हवा हळूहळू कमी व्हायला लागते. डोळे अपोआप जड होऊ लागतात. इतके जड होतात कधी मिटतात हे आपल्यालाच कळत नाही. दुपारची ही पेंग कितीही नकोशी असली तरी, ती आपला पिच्छा पुरावाल्याशिवाय राहत नाही. काम करण्याचा उत्साह अगदी मावळून गेलेला असतो आणि एक छानशी डुलकी काढण्याचा मोह अनावर होतो. पण ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अशी डुलकी घेण्याची परवानगी नसते त्यामुळे अगदी नाईलाजाने आपण स्वतःला जुंपून घेतो. एखाद दिवस असं झालं तर ठीक पण, जर हेच रुटीन राहिलं तर याचा तुमच्या परफॉर्मन्सवर आणि एकूणच आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. दुपारचीही झोप टाळण्यासाठी काय करता येईल याचा कधी विचार केलाय का? नसेल तर इथे दिलेल्या काही टिप्स फॉलो करता येतात का पहा... याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दिवसा आनाहुत...

नकारात्मक विचार पळवून लावण्यासाठी तुम्ही कधी हे मार्ग अवलंबले आहेत का?

Image
“मी आज नवीन काही तरी शिकलं पाहिजे.” “नाही तर नकोच, काही नाही जमलं तर उगाच वेळ वाया जाणार, वर उरलेली कामं होतील तीही नाही होणार.” वरील प्रकारचा संवाद हा आपलाच आपल्याशी होणारा संवाद आहे. दिवसातून आपण कित्येक गोष्टीवर असा स्वसंवाद साधत असतो. यातील काही भाग सकारात्मक तर फार मोठा भाग हा नकारात्मक स्वरूपाचा असतो. बारकाईने पाहिलं तर इतर कुणाहीपेक्षा आपला हा स्वसंवादच आपल्यासाठी प्रेरणादायी किंवा आपल्याला खचवणारा असतो. विज्ञानाच्या मते एका दिवसात माणसाच्या डोक्यात ७० हजारहून जास्त विचार जन्म घेतात. यातील सकारात्मक किती नकारात्मक किती हे आपण मोजू नाही शकाणार पण, यात नकारात्मक विचारांचा वाटा नक्कीच जास्त असतो. खरं तर कुणालाच आपण नकारात्मक विचार करावेत असं वाटत नाही किंवा कुणीही ठरवून नकारात्मक विचार करत नाही. याउलट सकारात्मक विचार ठेवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक आपल्या विचारांवर काम करावे लागते. आजच्या या लेखात आपण हेच पाहणार आहोत. किमान, नकारात्मक विचार ओळखून ते बाजूला कसे करायचे यावर जरी आपण विचार केला तरी पुष्कळ होईल.   २४ तास सकारात्मक राहणं कुणालाही शक्य नाहीच, तरीही किमान नका...