प्राध्यापक असूनही हा माणूस पत्र्याच्या डब्यापासून काचरापेटी बनवतोय!
शाळेत जाऊन मुलांना फक्त गमभन लिहायला वाचायला शिकवणं एवढंच शिक्षकाचं काम नाही तर, समाजात एक सुजाण नागरिक म्हणून कसं वावरायचं? याचे धडेही आपल्याला शिक्षकांकडूनच मिळतात. समाजातील न्याय आणि नैतिक मुल्यांची शिकवणही आपल्याला आपले शिक्षकच देतात. म्हणूनच आई-वडिलांच्या नंतर आपल्याला आपल्या शिक्षकांविषयी प्रचंड आदर वाटतो. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच समाजात जागरूकता निर्माण करणारा एक शिक्षक काय काय करू शकतो हे जर पहायचे असेल तर आपल्याला उत्तराखंड राज्यातील अल्मोडा तालुक्यतील शिक्षक जमुना प्रसाद तिवारी यांच्या विषयी जाणून घेतलं पाहिजे. Image source : Google प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते असेही म्हणायचे आणि दुसरीकडे तेच प्लास्टिक विविध रुपात बाजारात आणायचे. हा दुटप्पीपणा सहन न होणारे जमुना प्रसाद यांनी पत्र्याच्या डब्यापासून कचराकुंड्या बनवल्या. स्वतःच्या हातानी बनवलेल्या या कचराकुंड्या ते आजूबाजूच्या लोकांना फुकटात वाटतात. पर्यावरण वाचवा आणि स्वच्छता राखा अशा नुसत्या घोषणा देऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात तिवारी यांना फारसा रस नाही. त्याउलट त्यांनी स्वतः एक अशी वाट निवडली...