मोहित करहानाला संशोधनासाठी मिळणार पावणे दोन कोटीची फेलोशिप! (Mohit karhana)
लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती| प्रयत्न करत राहणाऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळतेच. याचे ताजे उदाहरण म्हणजे हरयाणाचा मोहित करहाना! २२ वर्षाच्या मोहित करहानाला ( Mohit Karhana) अमेरिकेच्या केंटुकी युनिव्हर्सिटीकडून ( University of Kentucky) पीएचडी साठी पावणे दोन कोटीची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. indiatimes.com हरियाणा राज्यातील गुरूग्राम जिल्ह्यातील गुलाखुवास गावापासून मोहितचा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनापासूनच मोहित अभ्यासात हुशार होता. त्याची आई बबिता करहाना यांनी नेहमीच आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या स्वतः देखील सरकारी सेवेत कार्यरत आहेत. मोहितची आई बबिता यांना लग्नानंतर उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. लग्नानंतर काही वर्षानी त्यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला ज्यामुळे सुमारे दीड वर्षे तरी त्यांना आयसीयूत ठेवावे लागले होते. अशा सर्व खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले. त्यांची मुलगी अंजली चंडीगड विद्यापीठा...