संपूर्ण दिवस आनंदात जावा असे वाटत असेल तर दिवसाची सुरुवात अशी करा.

Image source : Google


मनाला ताजेतवाने आणि सशक्त ठेवण्यासाठी रोज सकारात्मक विचारांचे खाद्य देण्याची गरज असते. रोजचा दिवस आनंदी जाणार की उदास हे तुमच्या परिस्थितीपेक्षा जास्त मन:स्थितीवर अवलंबून असते आणि मन:स्थिती तुमच्या विचारांवर अवलंबून असते. विचार आणि भावना यांचा संयोग जुळून आला की ती आपण त्याच भावनेच्या लाटेवर स्वार होतो.  दिवासभराचा आपला मूड कसा राहणार हे ठरवणे आपल्या हातात आहे. त्यासाठी फक्त आपल्याला स्वतःशी होणारा संवाद तपासावा लागेल आणि तो जर चुकीचा होणार असेल तर जाणीवपूर्वक बदलावा लागेल.

इथे काही सकारात्मक वाक्यांची यादी देत आहोत, ती वाचा आणि त्यातून तुम्हाला योग्य वाटतील अशा सकारात्मक विधानांची निवड करून ती तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी करून ठेवू शकता किंवा पाठ करू शकता.

१. मी या नव्या दिवसाचे अतिशय आनंदाने, आशावादी होऊन आणि विश्वासाने स्वागत करत आहे.

२. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा असणार आहे.  

३. मी माझ्यातील नाकारात्मकता, चिंता, भय बाहेर सोडत आहे आणि या विश्वातील सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये सामावून घेत आहे.

४. मी शांतता, प्रसन्नता आणि पवित्र्याचा अनुभव घेत आहे.

५. जे जे माझे आहे त्यासाठी मी पात्र आहे. माझ्या जवळ असणाऱ्या सर्व वस्तु, सुखसोयी, माझे कुटुंब, माझ्या मित्रपरिवार, माझे प्रियजन या सर्वांसाठी मी कृतज्ञ आहे.

६. योग्य वेळी आणि योग्य क्षणी मला जे-जे हवे ते मिळणार आहे.

७. या विश्वातील शक्ति माझे रक्षण करतात यावर माझा दृढ-विश्वास आहे.

८. माझ्या इच्छा पूर्ण होणारच यावर माझ्या विश्वास आहे.

९. माझ्या क्षमतेनुसार आणि माझ्या गतीने मी माझ्या आयुष्यात प्रगती करत आहे.

१०. कृतज्ञता आणि प्रेम यांनी मी ओतप्रोत भरलेली/भरलेला आहे.

११. वैश्विक शक्ति नेहमी माझ्या मदतीला तत्पर असतात.

१२. माझा माझ्यातील आंतरिक शक्तीवर विश्वास आहे.

१३. माझ्या आयुष्यात खरोखरच काही गोष्टी मनासारख्या घडत आहेत आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

१४. मी सुखी, स्वस्थ आणि सुरक्षित आहे.

१५. आयुष्यात जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होईल तेही चांगल्यासाठीच होईल.

१६. माझ्यासाठी जेजे चांगले आणि उत्तम असेल ते ते मला मिळाले आहे आणि इथून पुढेही मिळत राहील.

१८. आज माझ्या आयुष्यात काहीतरी जबरदस्त घडणार आहे. त्यासाठी मी कृतज्ञ आहे.

१९. आज मी ठरवलेली सगळी कामे ठरल्याप्रमाणे आणि सहजतेने होणार आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

२०. माझ्या सगळ्या चिंता सोडून देत आहे. सगळे काही चांगले होईल यावर माझा विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing