काळजी करून काय होणार?
संध्याकाळच्या भाजीची तयारी करता करता, लता घड्याळाकडे पाहत होती, तिच्याही नकळत या दहा मिनिटात तिने दहा वेळा घड्याळाकडे पहिले होते. समोर तिच्या सासूबाई पेपर वाचत बसल्या होत्या. त्यांच्या बारीक नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी लताला विचारलंच, “काय गं लता कसल्या विचारात आहेस? कुठे जायचं आहे का तुला?” Photo by Andrea Piacquadio from Pexels “काही तरीच, आता यावेळी मी कुठे जाणार?” थोड्याशा ताणलेल्या स्वरात लता उत्तरली. “मग काय सारखी घड्याळाकडे पाहतेस मघापासून?” “अहो, स्वरा आली नाही अजून म्हणून बघतेय किती वेळ झाला?” तोच ताणलेला स्वर. येईल की सारखं असं घड्याळाकडे पाहून काय होणार? फोन करून बघ कुठे आहे? का उशीर झाला?” त्यांचं हे बोलणं सुरुच होत तेवढ्यात स्वरा आलीच. आल्या आल्या आजीच्या गळ्यात पडली आणि तिथेच बसली. लताकडे तिचं लक्षच नव्हतं. लता मात्र मघापासून तिला उशीर का झाला या काळजीने अस्वस्थ झाली होती. इतकी अस्वस्थ झाली होती की तिची चलबिचल तिच्या शेजारी बसलेल्या सासूलाही जाणवली. खरं तर मुलीला पाच-दहा मिनिटं उशीर झाला तर काही वाटत ...