World's top coder ठरलेला कलश गुप्ता आणि त्याची अभिमानास्पद कामगिरी... !! वाचा तरी नक्की त्याने काय केलंय?

भारताला बौद्धिक संपदेची परंपरा आहे. आजवर अनेक भारतीयांनी जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा, बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे. विज्ञान असो की कला भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. दिल्लीच्या कलश गुप्तानेही भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवून ही परंपरा कायम राखली आहे.

 

dnindia.com

दिल्ली आयआयटीमध्ये इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कलश गुप्ताने जगातील पातळीवर भारावल्या जाणाऱ्या कोडींग स्पर्धेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे टीसीएस कोडव्हिटा (TCS-CodeVita season 10) ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. ८७ देशातून एक लाख स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या एक लाख स्पर्धकांना मागे टाकत कलशने या स्पर्धेत आपला विजय नोंदवला आहे.

 

आयआयटी दिल्लीत शिकणाऱ्या कलशने JEE (Engineering Entrance Exam/Joint Entrance Exam) परीक्षेतही संपूर्ण देशातून तिसरा क्रमांक पटकावला होता. दिल्ली विभागातून तो प्रथम आला होता.

 

कलशने या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावले असून या स्पर्धेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे चिले आणि तैवानचे विद्यार्थी आहेत. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना टीसीएसच्या नाविन्य आणि  संशोधन संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. कलश सोबतच भारतातील विविध विद्यापीठातील २१ विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.

 

Uploading: 598543 of 598543 bytes uploaded.
IIT Delhi Website

कलशला या स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून दहा हजार डॉलर (तब्बल पावणे आठ लाख रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. कलश म्हणतो, “इतकी मोठी रक्कम जेव्हा बक्षीस म्हणून मिळाल्याचे जाहीर झाले तेव्हा सुरुवातीला तर मी सुन्नच झालो होतो. या स्पर्धेत मी विजयी ठरेन किंवा अपयशी ठरेन अशी कोणतीच द्विधा अवस्था माझ्या मनात नव्हती. स्पर्धेसाठी दिलेला पहिला प्रश्न सोडवातानाच माझी भंबेरी उडाली होती. पण, तो प्रश्न सोडवण्यात यश आले आणि पुढील सगळे प्रश्न मला पटपट सुटत गेले. एकेक प्रश्न सोडवत पुढे जाईल तसा माझा आत्मविश्वास वाढत चालला होता. शेवटच्या क्षणी तर मला खात्री वाटत होतीच की मी पहिल्या तीन मध्ये नक्कीच असेन.” दिल्ली आयआयटीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी कलशच्या या कामगिरीचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आहे.

 

कम्प्युटर प्रोग्रामिंग बद्दल युवा पिढीत आकर्षण निर्माण व्हावे. कोडींग म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे आणि ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्यासाठी एखाद्या खेळाप्रमाणे सोपी व्हावी म्हणून जागतिक पातळीवर कोडव्हिटा ही स्पर्धा भरवली जाते. जगातील तरुणाईने आपल्या कौशल्याने एकमेकांना मात द्यावी एवढाच यामागचा निखळ हेतू आहे. या सर्वातून ते प्रत्यक्ष आयुष्यातील अडचणींवरही मात करायला शिकतील अशी आयोजकांची अपेक्षा आहे.

Uploading: 286212 of 286212 bytes uploaded.
Youtube
 

यापूर्वीही कलशने अनेक मोठमोठ्या स्पर्धेत आपली मोहोर उमटवली आहे. २०१६ सालच्या नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (National Talent Search Examination/NTSE) मध्येही त्याने आपला झेंडा रोवला होता. २०१७ साली भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतही त्याला पुरस्कृत करण्यात आले होते. २०१८ साली त्याला आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने दिली जाणारी आदित्य बिर्ला स्कॉलरशिपदेखील मिळाली होती. याशिवाय अनेक नामांकित संस्थेतून त्याने इंटर्नशिप सुद्धा केली आहे. यात एनके सिक्युरिटीक रिसर्च, टॉवर रिसर्च कॅपिटल, अशा मोठमोठ्या संस्थांचा समावेश आहे. हॉंगकॉंगच्या जेन स्ट्रीट संस्थेमध्येही त्याला इंटर्नशिप मिळालेली आहे.

 

कलशच्या या कामगिरीबद्दल सर्वथरातून त्याचे कौतुक केले जात आहे. सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर तर त्याच्या वर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कलशचे कौतुक करणारी पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.


कलश या यशाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

 मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments