Posts

Showing posts from May, 2023

चला सुरू करू आनंदाची भिशी!(Gratitude Jar)

Image
आशुचा वाढदिवस होता. त्या दिवशी ती फार छान तयार झाली होती. सगळेजण तिचं कौतुक करत होते. सगळ्यांच्या कौतुकाच्या शब्दामुळे आशु खूप आनंदात होती. तिची मैत्रिणी अन्वी आली. अन्वी म्हणाली डोळ्याखाली डार्क सर्कल किती वाढलेत तुझ्या...? झालं सगळ्यांना सोडून आशु दहा वेळा स्वतःला आरशात बघून आली खरंच डार्क सर्कल आलेत का? आई, मावशी, दीदी सगळ्यांना विचारून खात्री करून घेतली.   आलेल्या सगळ्या लोकांनी आशुचं कौतुक केलं होतं. एकटी अन्वी सोडल्यास तिच्याबद्दल कुणीही निगेटिव्ह कमेंट केली नव्हती. तरीही सगळ्या चांगल्या कमेंट्स सोडून आशु एकट्या अन्वीच्या कमेंटने इतकी अस्वस्थ का झाली? कारण, आपल्या मनाला तशा पद्धतीने विचार करण्याची सवय लागलेली असते. अर्थात मानवी मन नेहमीच नकारात्मक शक्यता जास्त गृहीत धरतं. आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टींची दखल घेण्याची तितकीशी सवय नसल्याने हे होतं. मानवी स्वभावाचा तो एक भाग आहे. आपले पूर्वज जंगलात राहत होते. त्यावेळच्या असुरक्षित जीवनाचा भाग म्हणून सतत भीती, नकारात्मकता आणि असुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ होती. आता आपण अधिक सुरक्षित जीवन जगत असलो तरी, मानवी मेंदू नकारात्मक गोष...

तुमच्या नात्यात या गोष्टी असतील तर तुमच्या जोडीदाराशी असलेलं तुमचं नातं आणखी दृढ होऊ शकतं.

Image
नात्यात वाद-विवाद , मतभेद, रुसवे फुगवे, राग हे होतंच राहतं. या सगळ्या दुविधांच्या पलीकडे जाऊन नातं अधिक दृढ आणि बळकट करायचं असेल तर नात्यासाठी आवर्जून वेळ द्यावा लागतो. जोडीदाराशी जुळवून घेणं, त्याला समजून घेणं, त्याला वेळ देणं, एकमेकांच्या अडचणी , समज गैरसमज शेअर करणं , त्याबद्दल बोलणं , एकमेकांना मदत करणं , मार्ग काढणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सुखी संसारासाठी याच गोष्टी फार महत्वाच्या असतात. आर्थिक स्थैर्य, समाजिक प्रतिष्ठा , मान्यता यांच्याही पलीकडे नात्यात दोघांच एक वेगळं जग असतं. हे जग सुंदर करण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात. आता बघूया नातं सुंदर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरतील. लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टींसाठी एकमेकांच्या व्यस्त दिनक्रमातून काही खास वेळ काढणं गरजेचं आहे. आणि हा खास वेळ फक्त याच कामासाठी वापरायचा, हे लक्षात राहणंही गरजेचं आहे. नातं टिकवणं ही कुणा एकट्याची जबाबदारी नसते. यासाठी दोन्ही बाजूंनी तितकीच ओढ असायला लागते. डेटिंग – अतिशय मस्त आणि मस्ट अशी ही कल्पना आहे. मुव्ही किंवा डिनर डेट या कल्पना चांगल्याच आहेत. पण याव्यतिरिक्त तुम...

द अल्केमिस्ट – एका स्वप्न साधकाचा प्रवास

Image
ब्राझिलियन लेखक पाउलो कोएलो यांची 'द अल्केमिस्ट'  कादंबरी १९८८ साली प्रसिद्ध झाली. प्रत्येक पुस्तक त्याच्या त्याच्या कुवतीनुसार आपल्याला काही तरी देऊन जातं. तसच हेही एक पुस्तक. आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातं. स्वप्न पाहत नाही असा माणूस सापडणार नाही. पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणारी त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारी माणसं मात्र खूप विरळ असतात. मुळात आपण स्वप्नं निवडतो की स्वप्नांनी आपल्याला निवडलेलं असतं हाही एक प्रश्न आहे. स्वप्न पाहिलेल्या क्षणापासून ते तो पूर्ण होईपर्यंतच्या क्षणापर्यंतचा प्रवास किती अद्भूत असू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर ही कादंबरी जरूर वाचा. मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिलेली ही कादंबरी जगातील अनेक भाषांत भाषांतरीत झालेली आहे. मराठीतही नितीन कोतापल्ले यांनी या कादंबरीचा अनुवाद केला आहे. Image source Google या कादंबरीचा नायक एक मेंढपाळ आहे. त्याच्या घरच्यांना वाटत होतं की त्याने धर्मगुरु व्हावं पण सँतीयागो मात्र मेंढपाळ होणाचा मार्ग निवडतो. मेंढ्यामागून फिरता फिरता त्याला भटकंती करायला मिळेल आणि या भटकंतीतून त्याला जगाबद्दलचं भरपूर ...

असुरक्षिततेच्या भावनेपासून सुटका करून घेण्याचे हे मार्ग अवलंबून पाहा!

Image
असुरक्षितता म्हणजे मनातील काल्पनिक भीती. सतत काही तरी (वाईट) घडेल अशी धास्ती. आपलं नातं टिकेल का ? इथपासून ते आपण हे करू शकू का ? इथपर्यंत अनेक गोष्टींबाबत - व्यक्तींबाबत अविश्वास निर्माण होणं, स्वतःबद्दल न्यूनगंड, कामाबद्दल अनास्था , ताण , नैराश्या अशा अनेक समस्या या असुरक्षिततेच्या भावनेतूनच निर्माण होतात. ही असुरक्षिततेची भावना येते कुठून आणि ती कशी हाताळायची याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. Image source - Google असुरक्षितता म्हणजे आपल्या क्षमता आणि आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे. बरेचदा मनातील नकारात्मक विचार यात आणखी जास्त भर घालतात. नातेसंबंध , काम , नोकरी , छंद, सामाजिक संबंध अशा अनेक गोष्टींवर याचा प्रभाव दिसून येतो.   यातून स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलही अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे कुणाशीही आपुलकीचे नाते तयार होत नाही आणि झाले तरी ते टिकत नाही. आत्मविश्वास डळमळीत झाल्याने कामावरही लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे करिअरही रखडते आणि आर्थिक तणावदेखील निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे असुरक्षिततेची भावना आणखी गडद होत जाते. असे हे दुष्ट चक्र आहे....

सतत काहीतरी शिकण्याचा प्रवास निरंतर सुरू राहो!

Image
चित्र प्रातिनिधिक सोर्स - गुगल  सकाळी क्लाससाठी घरातून बाहेर पडले पण, क्लासला अजून थोडा वेळ होता. नाही तर... मी तिथे जाणार, तिथलं कुलूप बघणार, मग सरांना कॉल करणार मग ते म्हणणार पाच मिनिटात आलो. एक्झॅक्ट पाच मिनिटं तिथं विनाकारण रेंगाळावं लागणार. हे सगळं टाळण्यासाठी म्हणून म्हटलं थोडा चहा घेऊ. रस्त्यात एस.एम.लोहियास्कूलच्या समोर एक मोठा गाडा दिसला. ज्यावर नाष्टा मिळेल, चहा, उप्पीट, पोहे शिरा आणि मिसळ असा बोर्ड लावला होता. गाडा बघून मी गाडी थांबवली. गाडी वळवता न आल्याने रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवून रस्ता क्रॉस करून मी पलीकडे गेले. चहा घेतला. चहा घेता घेता गाड्याचं थोडं निरीक्षण केलं. गाड्यावर अनेक छान क्रिस्पी क्रंची tagline लिहिले होते. चहाच्या गाड्यावर सुद्धा मराठी कंटेंटचा चपखल वापर केला होता. हल्ली हे प्रत्येक ठिकाणी दिसतंच. आजच्या काळात ‘कंटेंट इज किंग’ असं का म्हटलं जातं ते लक्षात येतं. अनेक छोटे मोठे रेस्टॉरंट्स सोबतच आता छोट्या गाड्या असणारे लोकंही कंटेंट मार्केटिंगचा मार्ग निवडत आहेत. त्या सगळ्या लाईन्स वाचता वाचता चहा कधी संपला ते कळलं नाही. त्यातील काही लाईन्स लक्षा...

मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी जाणून घ्या काही सोपे उपाय!

Image
कामाचा तणाव, भविष्याची चिंता, भीती, यामुळे तुम्ही देखील मानसिक अशांतीचे शिकार झालाय का? कुठल्याही कामात म्हणावं तस लक्ष लागत नाही. मनात सतत काही ना काही उलथापालथ सुरू असते. कधी याबद्दल तर कधी त्याबद्दल विचार करून करून असुरक्षित वाटू लागतं. परिस्थितीचा दबाव असा असतो की आपल्याला सहज-सोपा-सरळ मार्गच दिसत नाही. गोंधळल्यासारखं होतंय?  Image Source : Google फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूची सगळीच लोक सध्या अशा मानसिक द्विधावस्थेत आहेत. सतत अस्वस्थ आणि अशांत वाटत आहे. मानसिक शांतता हवी आहे. पण ती कशी मिळवायची आणि कशी टिकवायची हे मात्र माहित नाही.  आधी आपण मानसिक शांतता म्हणजे काय हे पाहू.  आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येणे, स्वतःबद्दल सकारात्मक भावना असणे, परिस्थितीचा बाऊ न करता त्याकडे तटस्थपणे पाहता येणे म्हणजे मानसिक शांतता. दररोजची कामे करताना ताण किंवा थकवा न जाणवणे, दिवसभरात कुठलंही काम अचानक येऊन पडलं तरी ते आपण करू शकतो हा आत्मविश्वास वाटणे म्हणजे मानसिक शांतता. इतरांबद्दल सहानुभूती वाटणे, त्यांच्याशी जुळवून घेता येणे, स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून न राहणे म्ह...

तेच तेच काम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येतो? मग हा कंटाळा कसा घालवाल?

Image
काही लोकांना कामावर जाण्याचा किती उत्साह असतो तर दुसरीकडे काही लोकांना कामावर जाणं म्हणजे मोठी शिक्षा वाटते. दोन्ही प्रकारचे दिवस आपण कधी न कधी अनुभवत असतोच. कधीकधी आपणही ऑफिसमध्ये जाण्यासाठी इतके उतावीळ असतो की वेळेआधीच आवरून तयार असतो. कधीकधी मात्र घरातून बाहेर पाऊलही टाकावं वाटत नाही. अचानकच आपल्याला कामाबद्दल अनास्था का निर्माण होते आणि अशावेळी आपण काय करू शकतो याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. या प्रकारचा अनुभव तुम्हीही घेतला असेल किंवा घेत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कामाबद्दल अनास्था वाटण्याची किंवा काम करू नये असं वाटण्याची अनेक कारणं आहेत. झोप पूर्ण झाली नसल्यास – पुरेशी झोप झाली नसेल तर आपल्याला ताजतवानं वाटत नाही. त्यामुळे कामावर जाण्याची इच्छा होत नाही , हे खरं आहे. ऑफिसचं काम तर सोडाच पण घरातली साधी-साधी कामं करण्याचाही कंटाळा येतो. झोप पूर्ण न झाल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही. आज आपल्याला काय करायचं आहे , हे आठवताना मेंदूवर अधिक जोर द्यावा लागतो. पटपट निर्णय घेता येत नाहीत. कामाच्या ठिकाणी ही सगळी कौशल्ये आपल्याला दररोज वापरावी लागत...

आयुष्यातील कोणताही संघर्ष स्वप्रेमाच्या बळावरच जिंकता येतो!

Image
संपूर्ण आयुष्यात उलथापालथ घडवून आणणारी एखादी घटना आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम करून जाते की आपला स्वतःवरीलच विश्वास डळमळीत होतो. परिस्थिती बदलते पण तिच्या खुणा/व्रण मनावर कायम राहतात. अशावेळी हताश न होता पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहणं यालाच तर संघर्ष म्हणतात. लक्षात ठेवा आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग येतील जातील या प्रसंगात कोणी तुमची साथ देईल कोणी सोडून जाईल. पण , या सगळ्या प्रसंगात एक साथ महत्वाची...ती म्हणजे स्वतःची साथ.   सगळं काही संपलं असं वाटत असतानाच पुन्हा नव्या जिद्दीनं उभं राहण्यासाठी लागतो तो आत्मविश्वास आणि स्व-प्रेम. पण आत्मविश्वासच नसेल तर स्वत:वर प्रेम तरी कसं होणार. त्यासाठी आधी आत्मविश्वास पुन्हा मिळवावा लागणार. तो आपल्यातच कुठे तरी दडी मारून बसलेला असतो. हरलेला असतो. त्याला पुन्हा शोधून बळ देणं हे आपलंच काम. त्यासाठी कुणाची वाट पाहत बसलात तर ते कधीच शक्य होणार नाही. गमवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायाचा आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं ? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर , हा संपूर्ण लेख वाचाच.   आत्मविश्वास नसेल तर स्वतःबद्दल वाटणारी आस्था ,...