सॅनीटरी पॅडमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.

पोटात हलक्या कळा येऊ लागतात, कंबर अवघडून जाते, खाली ओलसरपणा जाणवायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की पिरीयड आलेत. त्यानंतर पहिली आठवण होते ती, सॅनीटरी पॅडची. दर महिन्याच्या त्या दिवसात आवरून लागणारी गोष्ट म्हणजे सॅनीटरी पॅड. पण हे सॅनीटरी पॅड आपल्या आरोग्यासाठी कितपत चांगले किंवा वाईट ठरू शकतात याचा कधी विचार केलाय का?

सॅनीटरी पॅड ही आजच्या काळात एक मुलभूत गरज बनली आहे हे खरं आहे पण हीच पुढे जाऊन त्रासदायक ठरणार असेल तर?



Toxic Links नावाच्या एका पर्यावरणासंबंधी काम करणाऱ्या NGOने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील जे top sanitary pads brand आहेत त्यांच्या वापरातून पर्यावरणाला तर हानी पोहोचतेच पण, स्त्रियांच्या आरोग्यावरही याचे विपरीत परिणाम होत आहेत.

यात अभ्यासामध्ये त्यांनी whisper, Stayfree, sofy, या inorganic brandsचा तर Peesafe, Nua, आणि Plush या organic brandsचा अभ्यास केलेला आहे. जास्तीत जास्त रक्त शोषून घेणे आणि फ्रेशनेस देण्याच्या उद्देशाने म्हणून या ब्रँड्सनी ज्या रसायनांचा वापर केलेला असतो तो आरोग्याला घातक आहे असं या अहवाल सादर करणाऱ्या डॉ. आकांक्षा मेहरोत्रा याचं म्हणणं आहे. या रसायनांमुळे PCOS/PCOD एंडोमेट्रोसिस, हायपोथायरॉयडीजम, अशा गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

अगदी प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक महिला आताच्या काळात सॅनीटरी पॅड वापरते. सॅनीटरी पॅड वापरणं ही आता सामान्य बाब बनली आहे. महिला मुलींना पाळीच्या दिवसात कपडे बदलण्याचा आणि लिकेजचा होणारा त्रास टाळण्यासाठी म्हणून हे पॅडस आरामात उपयोगी पडतात. अगदी ग्रामीण भागातील महिलाही कपड्याएवजी सॅनीटरी पॅड वापरण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारतात याचं मार्केटही खूप वाढलं आहे.

पण, सॅनीटरी पॅड नाहीतर मग काय? हे मात्र या अभ्यासकांनाही अजून कळलेलं नाही. तसं तर टॅम्पून, मेन्स्ट्रूअल कप असे पर्याय आले असले तरी हे पर्याय अजून पर्यंत तरी सामान्य महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीत. शिवाय, हे पर्याय किती फायदेशीर किंवा घातक ठरतील याबद्दलही काही ठोस माहिती सांगता येत नाही. रीयुजेबल पॅडस किंवा पिरीयड पँटीज हा त्यातला सुरक्षित पर्याय ठरू शकतो.


सॅनीटरी पॅड बनवताना त्याची शोषण क्षमता वाढवण्यासाठी त्यात पीएचथॅलिक नावाचं एक रसायन मिसळलेलं असतं. या रसायनच्या अधिक काळ संपर्कात आल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. शिवाय

 सॅनीटरी पॅड बनवताना वापरलेले volatile organic compounds (VOCs) मुळेही त्याठिकाणी रॅशेस उठणे, खाज होणे, इन्फेक्शन होणे असे प्रकार घडतात. या रसायनांमुळे वंध्यत्व, संप्ररेकांचे असंतुलन, असेही आजार उद्भवू शकतात.  सॅनीटरी पॅडमधून लिकेज होऊ नये म्हणून त्याच्या शेवटी विशिष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकचा थर दिलेला असतो. या प्लॅस्टिकमुळे त्वचेला आलेला घाम तिथेच साचून राहतो ज्यामुळे त्या भागात इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. यामुळे जळजळ होणे, आग होणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे, अशा समस्या उद्भवतात.

मग  सॅनीटरी पॅड्सना सुरक्षित पर्याय कोणता?


एक तर रीयुजेबल पॅड्स किंवा पिरीयड पँटीज हाच पर्याय सध्या तरी सुरक्षित वाटतो. अर्थात यातही लिकेज आणि हायजिनची चिंता आहेच. स्वच्छ आणि सुती कापड वापरणेही फायद्याचे ठरू शकते. मेन्स्ट्रूअल कपही सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी, ते सर्वांनाच परवडणारे नाहीत. शिवाय, मेन्स्ट्रूअल हे सिलिकॉनचे बनलेले असतात आणि काही जणींना याचीही अॅलर्जी असू शकते. हे कप अतिशय मऊ असतात पण हे योनीच्या आत वापरावे लागतात. योनीच्या आत दीर्घकाळासाठी अशी एखादी वस्तू ठेवून देणे अनेकींना अनकफर्टेबल वाटू शकते. त्याचा वापर कसा करायचा आणि त्याची स्वच्छता कशी ठेवायची याची सखोल माहिती घेतल्याशिवाय वापर करणे धोक्याचे ठरू शकते.



अधिक रक्त शोषून घेण्यासाठी म्हणून सॅनीटरी पॅड्समध्ये जे डायॉक्सिन वापरले जाते त्याच्या संपर्कातूनही कॅन्सर होऊ शकतो. अधिक काळासाठी सॅनीटरी पॅड्सवापरल्याने हे डायॉक्सिन आपल्या शरीरात शोषले जाते आणि आपल्या गर्भाशयाच्या भोवती कॅन्सरच्या पेशी निर्माण होण्याची शक्यता वाढते. यातूनच गर्भाशयाचा कॅन्सर, सर्विक कॅन्सरचे प्रमाणही वाढत आहे.

डायॉक्सिनमुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीही दबली जाते. त्यामुळे आपल्या योनी जंतू संसर्गाला लवकर बळी पडू शकते. योनीला होणारा हा संसर्ग आणि सॅनीटरी पॅड्सपासून होणारे धोके टाळण्यासाठी  खाली दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.

दर ३-४ तासांनी सॅनीटरी पॅड्सना बदलले पाहिजेत. मग तुम्हाला हेवी फ्लो होवो किंवा नाही होवो. कारण चार तासानंतर सॅनीटरी पॅड्समधील केमिकल त्वचेवर रीअॅक्ट होऊ लागतात.

योनीची स्वच्छता राखा.

पिरीयडच्या काळात भरपूर पाणी प्या ज्यामुळे UTI (urinary tract infection) सारखा त्रास होणार नाही.

स्वच्छ आणि चांगली सुकलेली पँटी वापरा.

ऑर्गनिक सॅनीटरी पॅड्सचा वापर करा.

फक्त फ्रेशनेससाठी म्हणून फ्रॅगरन्स असलेले सॅनीटरी पॅड्स वापरू नका.

सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे शक्यतो टाळा.

रीयुजेबल पॅड्स व्यवस्थित धुवून, सुकवून मगच वापरा.

स्वच्छ आणि आरामदायी पँटी वापरा.

 

इथून पुढे सॅनीटरी पॅड्स निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निवडा.

 

Post a Comment

0 Comments