एकमेका साहाय्य करू!

सगळं आपापलं करायचं म्हणजे काय? काय काय करू शकतो आपण एकट्यानं? आपण आपले जेवण बनवू शकतो. त्यासाठी लागणारं अन्न नाही पिकवू शकत. प्रत्येक घटक पदार्थ आपणच पेरायचा, पिकवायचा, शिजवायचा आणि आपणच खायचा... कल्पना करून बघा. तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीने असहकार पुकारला तर काय होईल? 





शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही, दुकानदाराने किराणा विकला नाही, दुधवाल्याने दुध आणून दिलं नाही... सगळं काही आपण एकटेच नाही करू शकत. 


स्वावलंबन हे एका मर्यादेपर्यंतच योग्य आहे. आपण सगळे परस्परावलंबी जीव आहोत. म्हणून नाती, कुटुंब, समाज, गाव, खेडं, शहर या रचना तयार झाल्या. 

मोटिव्हेशन म्हणून उगाच टोकाचं काही करण्यात अर्थ नाही.


जसं आपण इतरांवर अवलंबून असतो तसंच काही गोष्टींसाठी इतर जीवही आपल्यावर अवलंबून असतात. कुणी मदत मागितली तर, करायचं आपणच असं म्हणून हतबल असणाऱ्या व्यक्तींना अजून एकटं पाडू नका. काहीच करणं शक्य नसेल तर निदान ऐकून तरी घेऊच शकतो.

Post a Comment

0 Comments