नैराश्यातही रोजची कामं उरकण्यासाठी काय आयडिया वापरता येतील? तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का?
.jpg)
घर आवरायचं आहे, कपडे धुवायचे आहेत , परवा धुवून आणून ठेवलेले कपडे अजून घडी घालायचे आहे, स्वयंपाकाची तयारी करायची आहे, बाजारातून भाजी पण आणली नाही अजून... डोक्यात कामांची नुसती यादी सुरु असते पण एकाही कामाला हात लावू वाटत नाही. अगदी जे काम केल्याशिवाय पर्यायच नाही अशी कामं तेवढी कशीबशी उरकली जातात. ती करताना पूर्वीचा उत्साह जाणवत नाही. विनाकारण थकल्यासारखं वाटतं. स्वयंपाकात जिथे पूर्वी दोन भाज्या बनत होत्या तिथे आता एक भाजी करायचंही जीवावर येतं. ही लक्षणे म्हणजे आळस किंवा थकवा नव्हे. ही नैराश्याची लक्षणे आहेत. नैराश्य आलेल्या किंवा डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला आयुष्यातील अशा छोट्या-मोठ्या गोष्टीतही रस वाटत नसल्याने त्या गोष्टी करू वाटत नाहीत. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये जर असा बदल दिसत असेल तर , आळशी झालीये , घरात बसून काही काम नसतं म्हणून असं होतं , जरा बाहेर पड , फिरून ये , जग बघ म्हणजे कळेल , इतकंही नाही जमत मग काय उपयोग? असले शब्द वापरून आणखीन निराश करण्यापूर्वी एकदा या गोष्टीचा नक्की विचार करा. रोजची अगदी साधीसाधी वाटणारी कामं करणंही जेव्हा कठ...