‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा वापर कोणकोणत्या समस्यांमध्ये केला जाऊ शकतो?

‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे काय?’ हे आपण मागच्या लेखामध्ये पहिले. आज आपण पाहणार आहोत, या थेरपीचा वापर कोणकोणत्या समस्यांमध्ये केला जाऊ शकतो.

व्यक्ती सध्या कोणत्या प्रकारे विचार करत आहे आणि त्यातून तिला कोणत्या प्रकारच्या भावना अनुभवायला येतात याचे निरीक्षण करणे म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, हे तर आपण पहिलेच. पुढील समस्यांमध्ये या थेरपीचा उपयोग केला जाऊ शकतो.


१)       Anxiety/चिंता
२)       व्यसन/addiction
३)       भीती/phobia
४)      खूप राग येणे/anger disorder
५)      नैराश्य/depression
६)      Panic attacks
७)      वर्तनदोष/behavioral issues

या प्रमुख मानसिक समस्येसोबतच पुढील समस्यांशी जुळवून घेतानाही कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उपयोग होऊ शकतो.

१)          घटस्फोट/ब्रेकअप

गंभीर आजार असेल तर

न्युनगंड

निद्रानाश

नातेसंबंधातील तणाव

आपल्या वर्तनामागे आपले विचार आणि भावना यांचा जास्त प्रभाव असतो. उदा. एखादी व्यक्ती जर सतत पैशाच्या कमतरते विषयी विचार करत असेल तर, ज्या ज्या वेळी तिच्या हातून पैसे खर्च होतील त्या-त्या वेळी ती नकारात्मक भावना अनुभवणार. यातून तिच्या हातून पैशाची बचत होण्याऐवजी अधिकाधिक पैसे खर्च होत राहणार. यामुळे पैशाविषयीची भीती, त्यातून न कळत वाढलेला खर्च, मग पुन्हा पैशाचा तुटवडा असे दुष्ट चक्र सुरूच राहते. यामध्ये जर वेळीच तिने नकारात्मक विचार ओळखून त्याठिकाणी सकारात्मक विचार निर्माण केले आणि खर्चाचे योग्य नियोजन केले तर, तिच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक फरक पडलेला दिसून येईल.

कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा उद्देशच हा आहे की, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर जरी आपले नियंत्रण नसले तरी, त्या घटनांना आपण कसा प्रतिसाद देतो, हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे, याची जाणीव करून देणे.

या पद्धतीचे फायदे –

१)       आपल्या मूडवर परिणाम करणारे नकारात्मक आणि अतार्किक विचार ओळखून ते नाकारण्याची सवय लागते.

२)       इतर कोणत्याही सायकोथेरपीपेक्षा ही थेरपी जास्त परवडणारी आणि फायदेशीर आहे.

३)       या थेरपीचा परिणाम थोडा उशिरा जाणवला तरी, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा फायदा होणार आहे.

४)      ज्यांना औषधे न घेता मनोकायिक आजारावर उपचार घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी तर ही थेरपी म्हणजे वरदान आहे.

५)      निद्रानाश असणाऱ्यांसाठीसुद्धा ही थेरपी जास्त प्रभावी ठरते.

६)      चिंता, panic attacks, अशा प्रकारातदेखील ही थेरपी जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

 

कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीचा वापर करणे सुरुवातीला काही लोकांना फारच कठीण वाटू शकते. पण तुम्ही याचा वारंवार प्रयोग करत राहिलात तर एक दिवस तुम्हाला फरक नक्की जाणवेल. स्वतःमध्ये बदल करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असेल तर आणि तरच तुम्हाला याचा फायदा होईल. यासाठी तुमच्याकडे संयम हवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची तयारी हवी.

तुम्हाला सुरुवातीला या थेरपीचा वापर कसा करावा हे समजत नसेल तर, तुम्ही समुपदेशकांची मदत घेऊ शकता. ऑनलाईन/ऑफलाईन दोन्हीपैकी तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल ती पद्धत निवडा. समुपदेशकांना तुमच्याबद्दलची आवश्यक ती सर्व माहिती द्या. तुमच्या समस्येचे मूळ नेमके कोणत्या विचारात आहे, याची माहिती झाल्यावरच त्या विचारांना ओळखून त्याठिकाणी सकारात्मक आणि तार्किक विचार रुजवण्यासाठी ते मार्गदर्शन करतील.

उतावळेपणाने विचार करण्याने बरेचदा आपण आपलाच तोटा करून घेतो. त्याऐवजी कोणत्याही घटनेबाबत तार्किक विचार कसा करायचा, त्याला कोणत्या पद्धतीने प्रतिसाद द्यायचा हे ठरवून घेतल्यास स्वतःला अवास्तव विचारामुळे होणारा त्रास टाळता येतो.

 

 

Post a Comment

0 Comments