आई - वात्सल्यमूर्ती की न दिसणारा एक अबोल संघर्ष ?

मला हे का लिहावं वाटतंय ? तर फक्त ‘हे असंही असतं,’ हे इतरांना समजावं म्हणून. मानसिक आरोग्याच्या बाबतीत मी सातत्याने लिहित आहे. कारण एक तर हा विषय माझ्या आवडीचा आहेच पण, काही अत्यंत वाईट कारणांमुळे खूपच जवळचा झालेला आहे. गेल्या वर्षी मी आईपणाची दुसरी बाजू नावाचा एक लेख लिहिला होता ज्यात पोस्टपार्टम डिप्रेशनचा आई आणि बाबा दोघांवरही कसा परिणाम होतो याबद्दल लिहिलं होतं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने याच डिप्रेशनमधून आत्महत्या केल्यानंतर हा विषय चर्चेत आला. बाळंतपणानंतर स्त्रीचे मानसिक आरोग्य कितपत खालावू शकते याचे ते एक उदाहरण होते. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच आपले डोळे उघडतात. एरवी आपल्या आजूबाजूला जेव्हा अशीच उदाहरणं दिसतात तेव्हा मात्र आपण सोयीस्करपणे डोळ्यांना झापड लावून घेतो. दुसऱ्याच्या मानसिक आजारात त्याला साथ द्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच कदाचित अजून आम्हाला कळलेलं नाही आणि हे समजून घेण्याचे मार्ग सुद्धा खूप कमी आहेत. म्हणून हे होत असावं. Image source : Google आज आम्ही प्रेमचा चौदावा वाढदिवस साजरा केला. या निमि...