खुन्याचे शब्द
माझ्या हातातला चाकू फिरत होता आणि डोक्यात विचार.
किती तरी वेळ गेला आणि मी भानावर आले. कांदा कापण्यासाठी म्हणून घेतलेला चाकू हतात तसाच होता. पुढ्यात ठेवलेला कांदाही तसाच.
आजुबाजुला कापल्या गेलेल्या शब्दांच्या बेवारस मढ्यांचा खच लागला होता आणि नाकात शिरणारा कुबट वास डोक्यात झिणझिण्या आणत होता.
आता पुन्हा नवा विचार
खुन तर केला पण या मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची ?
© निर्मोही
Comments