चला सुरू करू आनंदाची भिशी!(Gratitude Jar)

आशुचा वाढदिवस होता. त्या दिवशी ती फार छान तयार झाली होती. सगळेजण तिचं कौतुक करत होते. सगळ्यांच्या कौतुकाच्या शब्दामुळे आशु खूप आनंदात होती. तिची मैत्रिणी अन्वी आली. अन्वी म्हणाली डोळ्याखाली डार्क सर्कल किती वाढलेत तुझ्या...? झालं सगळ्यांना सोडून आशु दहा वेळा स्वतःला आरशात बघून आली खरंच डार्क सर्कल आलेत का? आई, मावशी, दीदी सगळ्यांना विचारून खात्री करून घेतली. आलेल्या सगळ्या लोकांनी आशुचं कौतुक केलं होतं. एकटी अन्वी सोडल्यास तिच्याबद्दल कुणीही निगेटिव्ह कमेंट केली नव्हती. तरीही सगळ्या चांगल्या कमेंट्स सोडून आशु एकट्या अन्वीच्या कमेंटने इतकी अस्वस्थ का झाली? कारण, आपल्या मनाला तशा पद्धतीने विचार करण्याची सवय लागलेली असते. अर्थात मानवी मन नेहमीच नकारात्मक शक्यता जास्त गृहीत धरतं. आपल्या मेंदूला सकारात्मक गोष्टींची दखल घेण्याची तितकीशी सवय नसल्याने हे होतं. मानवी स्वभावाचा तो एक भाग आहे. आपले पूर्वज जंगलात राहत होते. त्यावेळच्या असुरक्षित जीवनाचा भाग म्हणून सतत भीती, नकारात्मकता आणि असुरक्षिततेची भावना अधिक प्रबळ होती. आता आपण अधिक सुरक्षित जीवन जगत असलो तरी, मानवी मेंदू नकारात्मक गोष...