तणाव तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यासोबतच तुमच्या आनंदाचाही बळी घेऊ शकतो.
दररोज आपण कितीतरी गोष्टी हाताळत असतो. घरची बाहेरची ऑफिसची दैनंदिन कामं करत असताना आपल्याला सतत काही विचार करावा लागतो , निर्णय घ्यावे लागतात , कुटुंबीय , ऑफिस कलीग यांच्याशी संवाद साधावा लागतो. त्यांची मदत घ्यावी लागते. कधी त्यांना मदत करावी लागते. या सगळ्या गोष्टी नेहमीच अगदी सुरळीत होतात असं नाही. कधी कधी यात काही उन्नीस-बीस होत राहतं. कधी घरच्यांशी खटकतं, कधी ऑफिसमध्ये तर कधी अगदी प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तीसोबत. आपल्याला यावर एक तर काही कृती करावी लागते किंवा आजूबाजूला काय घडतंय यावर सतत लक्ष ठेवून असावं लागतं. यातूनच निर्माण होतो तणाव. हा तणाव जर प्रमाणाबाहेर जायला लागला तर मात्र त्याचे शारीरिक , मानसिक आणि भावनिक परिणाम दिसायला लागतात. सरळसध्या आयुष्यावरही हा तणाव वाईट परिणाम घडवून आणतो. आपण सतत तणावात असतो किंवा तणाव आपल्यावर हावी होत आहे, हे ओळखायचं कसं पण ? आपण तणावात आहोत हे आपल्याला त्या-त्या क्षणी जाणवतंच पण हा तणाव निवळला गेला की साचून राहिला हे कसं ओळखायचं ? वाढलेल्या अतिरीक्त तणावाची काही लक्षणे आहेत. जी आपल्या मानसिकतेतून , शारीरिक व्याधीतून आणि भावन...