असुरक्षित मातृत्वाच्या व्यथित कथा..!

प्रसंग – १ माझं सिझेरियन झाल्यानंतर मला एका मोठ्या हॉलसारख्या ठिकाणी ठेवलेल्या बेडवर आणून टाकलं. हो अक्षरश: ‘टाकलं’ हाच शब्दप्रयोग इथे चपखल बसतो. जसं आपण केळीची सालं डस्टबिनमध्ये टाकतो. कारण , केळ खाल्ल्यानंतर तिच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. खरं तर सुरक्षित सिझेरियन करून सीपीआरच्या त्या डॉक्टरनी एकप्रकारे उपकारच केले होते. चित्र स्रोत: गुगल खरंच इतकी विदारक, असुविधाजनक , असुरक्षित परिस्थिती आपल्याच नशिबी असावी का असा विचार करत करत अर्धवट शुद्धीत ती रात्र तशीच काढली. दुसऱ्या दिवशी भूल उतरली आणि मी पूर्ण शुद्धीत आले. स्वतःच्या परिस्थितीची फारच कीव वाटत होती. मी उठून बसण्याचा प्रयत्न केला. उठून बसल्यावर जे दिसलं ते जास्त शुद्धीवर आणणारं होतं. समोरच्या बेडवर एक पेशंट होती जिचं पहाटे-पहाटे सिझेरियन झालं होतं. दुसरी मुलगीच झाली म्हणून ती प्रचंड नाराज होती. दोन-तीन तास होत आले तरी तिनं मुलीला जवळ घेतलं नव्हतं, की तिला दूध पाजलं नव्हतं. तिच्या सासरचं कुणीही माणूस दवाखान्यात फिरकलं नव्हतं. तिच्यासोबत तिची कुणीतरी मावशी होती , ती कितीदा तिची समजूत काढत होती. मुलीला पाजण्यासाठी. भुकेनं ...