Posts

नकारात्मक विचारांना सकारात्मक दिशा देता येते./Flip negative thoughts into positivity!

Image
  दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येत असतात. यातील कित्येक विचार हे नकारार्थी आणि आपल्याला मागे खेचणारे असतात. ‘वैरी न चिंती ते मन चिंती,’ असं उगीच म्हटलेलं नाही. आपल्याबद्दल ते आपल्या वैऱ्याच्याही मनात कधी येणार नाही ते आपल्या मनात आधीच येऊन गेलेलं असतं. ‘रिकामं मन सैतानाचं घर,’ अशीही म्हण आपल्याकडे रूढ आहेच. या सगळ्या म्हणीतून हेच सांगायचं आहे की, मनातील विचारांकडे आपले लक्ष असेल तर आपल्या कितीतरी चिंता निर्माण होण्याआधीच दूर होतात. आता प्रसादचंच उदाहरण घ्या. गाडी चालवायला शिकून त्याला आत्ता जवळपास दहा वर्षे तरी होत आली. अनेकदा त्याने दिवसरात्र प्रवास करून लांबचे अंतर कमी वेळेत पार केलेले आहे. पण, त्यादिवशी घरातून पार्टीला जाताना मध्येच त्याच्या मनात विचार आला, आपण इतकी फास्ट गाडी चालवतो पण, कधी कुठे अपघात झाला तर काय करणार? झालं या एका विचारातून त्याच्या मनात पुढे नकारात्मक विचारांची मालिकाच तयार झाली आणि अपघाताच्या नुसत्या कल्पनेनेच त्याला दरदरून घाम फुटला. खरं तशाही अवस्थेत तो गाडी चालवत होताच पण नुसत्या कल्पनेने त्याला हतबल करून सोडले. पण, अपघाताचा विचार त्याच्या मनात आला ...

नकोशा आठवणींचा ससेमिरा कसा टाळावा, यासाठी काही टिप्स./Tips to release painful memories.

Image
आठवणी चमत्कारिक असतात. आठवणी आपल्याला उलट्या पावलांनी भूतकाळात जायला भाग पाडतात. भूतकाळातील आठवणी आपला वर्तमान आणि भविष्यकाळही प्रभावित करत असतात. काही आठवणी सुखद असतात. ज्या आपल्याला आनंद देतात, तर वाईट आठवणी मात्र विंचवासारख्या डसत राहतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळाले, शिक्षकांनी कौतुक केले, नोकरीसाठी दिलेली मुलाखत यशस्वी झाली, अशा आठवणी आपल्याला प्रेरणा देतात. पण एखाद्या व्यक्तीशी झालेले भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, एखादा अपघात, कुणीतरी केलेली फसवणूक, प्रेमभंग अशा आठवणी आपल्याला आणखी कमजोर बनवतात. आठवणींचा हा खेळ जर जास्तच त्रासदायक होत असेल, तर काय करावं? या वाईट आठवणींच्या जंजाळातून सुटण्याचा काहीच मार्ग नसेल का? होतं काय घटना भूतकाळात घडून गेली असली तरी तिचे व्रण वर्तमानातही खुपत राहतात. काहींसाठी या आठवणी डिप्रेशनचे कारणही ठरतात. या आठवणींच्या दुष्ट पंजातून सुटका करून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला तसा निश्चय करावा लागेल आणि दुसरी गोष्ट त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल. तुमच्या या आठवणी आठवणीत राहिल्या तरी त्या  तुम्हाला छळणार नाहीत. भूतकाळातील आठवणी बाजूला सा...

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing

Image
  सगळेच प्राणी कामक्रीडा करतात, प्रजनन क्रियेतील तो एक अविभाज्य भाग आहे. पण, प्रणयाच्या बाबतीतही माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत वेगळाच आहे. प्रत्यक्ष प्रणयाइतकंच प्रणयाची सुरुवात आणि शेवट या दोन्ही गोष्टी माणसासाठी आणि नात्यासाठी महत्वाच्या आहेत. प्रणयाची सुरुवात तर नेहमीच मिठीने आणि किसने होते. आज ‘किस डे’ आहेच तर, आपण किस करण्याचे फायदे बघूया… जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करताना कधीकधी शब्द अपुरे पडतात तेव्हा आपसूकच आपण ते स्पर्शातून व्यक्त करतो. लहान मुलं जेव्हा रडतं तेव्हा ते आईकडे दिल्यावरच शांत होतं. कारण, त्याला त्या स्पर्शातून जाणवतं की आपण सुरक्षित आहोत. आई आणि मुलातील हा सुरक्षित बंध सुद्धा किस मुळेच जपला जातो. सुरुवातीला फक्त आपल्याला आईचा स्पर्श माहित असतो. मोठे होऊ तसे आपल्याला स्पर्शाची भाषा समजायला लागते. मग हा सगळा प्रवास येऊन ठेपतो पहिल्या किसपर्यंत! आयुष्यातील पहिल्या किस विषयी आठवून जर तुम्ही आजही मोहरून जात असाल तर, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात! किस हा विषयच इतका गोड आहे, की त्यांनतर सगळंच गोड वाटू लागतं. ‘किसिंग’ या पुस्तकाच्या लेखिका अँड...

आनंद कशाकशात आणि किती असतो. जाणून घेऊया

Image
आयुष्यात प्रत्येकाला आनंदी व्हायचं असतं. प्रत्येकाची आनंदाची व्याख्याही वेगवेगळी असते. आनंद म्हणजे अशी भावना ज्यात समाधान, पूर्णता आणि तृप्तता असेल. आनंदाचेही कित्येक प्रकार आहेत. प्रत्येक सकारात्मक भावना आनंदाशी निगडीत आहे. आयुष्यात समस्या, संघर्ष, तणाव असणारच आहे तरीही त्यांच्यासोबत जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला या आनंदी क्षणातूनच मिळते. आनंद शोधण्याचे कित्येक मार्ग आहेत. हे मार्ग जाणून घेऊन ते अवलंबता आले तर, आयुष्यातील निराशा, दु:ख, त्रास थोडा तरी कमी होईल. यातील बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती असतील आणि काही नव्या असतील. वेगवेगळ्या परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आनंदाचे हे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवेत. १.         कृतज्ञता – दैनंदिन जीवनातील चांगल्या गोष्टींची दखल घेण्यास कृतज्ञता खरोखर उपयुक्त ठरते. आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या गोष्टी, वस्तू आणि व्यक्तींची जाणीव होते. यामुळेही आपल्या आनंदात भर पडते. २.        नवा अनुभव – काही नवी गोष्टी केल्याने मिळणारा आनंद तुम्हीही अनुभवला असाल. नव्या ठिकाणांना भेट द...

जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय?

Image
माणसाचं सरासरी आयुष्य किती? तर साधारण, ७५ वर्षे. त्यातही अनेकांना ८०/९०/१०० वर्षे जगण्याचा बहुमान मिळतो. हो दीर्घायुष्य हे निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. आज जगणं महाग आणि मरण स्वस्त झालेलं असताना काही लोक शंभरी पार करण्याचा विक्रम कसा काय करू शकतात? Image Source: Twitter आता अमेरिकेत जन्मलेल्या ब्रेन्यीस मोरेरा या स्पानिश आजीचंच उदाहरण घ्या. या वर्षी आजींनी ११५व्या वर्षात पदार्पण केले. २३ जानेवारी रोजी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नोंद असणाऱ्या ल्युसील रँडन याचं निधन झालं आणि ११५ वर्षाच्या ब्रेन्यीस मोरेरा जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ति म्हणून गिनीज बुकात नाव नोंद होण्याची अनपेक्षित भेट मिळाली. ११५ वर्षाच्या आयुष्यात आजींनी दोन महायुद्धे, १९१८चा स्पॅनिश फ्लू, १९३६चे स्पेनमधील नागरी युद्ध आणि कोव्हीड-१९ची जागतिक महामारी एवढ्या जागतिक उलथापालथी पहिल्या आहेत. ब्रेन्यीस मोरेरा यांचा जन्म ४ मार्च १९०७ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. त्यांचा कुटुंबीयांनी त्यांच्या जन्माच्या एकावर्षापूर्वीच मेक्सिकोमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या पार्श्...

स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणं नक्कीच तुमच्या हातात आहे.

Image
स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणं नक्कीच तुमच्या हातात आहे. आयुष्यात नेहमीच हव्या त्या गोष्टी हव्या तेव्हाच मिळतील असं नाही. गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत की, उदास वाटणं, हुरहूर लागणं, असुरक्षित वाटणं साहजिक आहे. सतत जर नकारात्मक विचारात गुरफटून राहिलो तर समोर असलेल्या परिस्थितून कसा मार्ग काढावा हे कळणार तर नाहीच उलट ती आणखीन बिघडण्यास हातभार लागू शकतो. म्हणून सकारात्मकता ही जाणीवपूर्वक निवडावी लागते. एखाद्या परिस्थितीत सकारात्मक राहणं ही तारेवरची कसरत आहे. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास मार्ग सापडत जातात. मग निवडणार काय सकारात्मकता की नकारात्मकता, तुम्हीच ठरवा. नकारात्मक विचारात गुरफटला तर तुमचा स्ट्रेस वाढेल, ज्याचे तुमच्या शरीरावर, आरोग्यावर, मानसिकतेवर, तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सकारात्मकता निवडलीत तर आहे त्यातही शांत, आनंदी आणि समाधानी राहण्याचा फायदा होईल. सकारात्मक राहा, म्हणजे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून शेख चिल्लीसारखे अवास्तव स्वप्नांचे मनोरे रचा असा होत नाही.   तर तुम्हाला तुमच्या समस्यांची जाणीव असली पाहिजे पण त्या...

मनसोक्त रडणंही कधी कधी चांगलं असतं. पण...

Image
“रडू नको.”  “का रडतेस?” “किती ते रडायचं?” अशी रडणं नाकारणारी वाक्य ऐकत ऐकतच आपण मोठे होते. लहान असताना छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडणारे आपण मोठं होण्याच्या अट्टाहासात रडणंही विसरून जातो.  या जगात आपण सुखरूप अवतरलो ही गोष्टही आपण रडण्यातून जाहीर करतो. जन्मानंतर आपणं सुखरूप आहोत ही आनंदाची वार्ता आपण रडूनच सांगतो आणि तरीही आयुष्यभर या रडण्यापासून दूरदूर पळत राहतो. रडणारी लोकं खंबीर नसतात. रडणारी लोकं आयुष्यात काही करू शकत नाहीत. अशी वाक्य ऐकून ऐकून आपल्याही मनात या भावनेबद्दल एक नकारात्मकता तयार होतेच. मग आपण इतरांसमोर रडू शकत नाही म्हणून खाजगीत, एकांतात, एकट्याने रडतो.  कुणी आपल्यासमोर रडत असेल तर आपणही त्याला हीच ऐकलेली, वाक्य ऐकवत राहतो. ‘रडू नको,’ ‘रडायचं नसतं,’ हेच सांगत राहतो. पण का? का नाही रडायचं? हे कधीच स्वतःलाही आपण विचारत नाही.  रडायचं नाही हे वाक्यानं माझ्या डोक्यातही असच घर केलं होतं. प्रत्येक गोष्ट हसून मागे टाकताना आत रडणं साचत चाललंय हे लक्षातच आलं नाही. अर्थात अगदीच रडणं बंद असंही झालं नव्हतं. जेव्हा जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा तेव्हा ते अश्रूंच्या...