स्वतःवरही भरपूर प्रेम करू शकतो आपण! या Valentine ला स्वतःवरचं प्रेम व्यक्त करा!

प्रेमाचा आठवडा सुरु आहे. प्रेमाच्या या प्रवासाची सुरुवात होते ती स्वतःपासून आणि स्वतःवरील प्रेमाची सुरुवात होते आत्म-स्वीकारापासून. पण स्वतःचा स्वीकार म्हणजे तरी काय? स्वतःला आहोत तसं स्वीकारणं म्हणजे आत्म-स्वीकार. हे वाक्य वाचायला जितकं सोपं आहे तितकंच प्रत्यक्षात अवलंबायला कठीण! मुळात आपण कसे आहोत हेच बरेचदा आपल्याला माहीत नसतं. मग हा प्रवास स्वतःला ओळखण्यापासून सुरू व्हायला हवा. एकदा का स्वतः आपण कसे आहोत कसे नाही हे कळालं की, मग ते स्विकारणं सोपं होईल नाही का? बरेचदा इतरांनी दिलेले शेरे, कौतुक, मान अपमान याच चष्म्याने आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते. पण, मुळात आपण कसे आहोत, कसे होतो? हेच कधी कधी विसरून गेलेलं असतं. असे इतरांनी दिलेली मतं आपण आपल्यावर लादली आहेत का हेही पाहायला हवं. कधी कधी अशी मतं न कळत आपल्यात रुजलेली असतात, आपण ती स्वीकारलेली असतात. स्वतःला स्वीकारताना, अशी लादलेली प्रतिमा नाकारताही यायला हवं. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा आपण स्वतःला ओळखलं, एकदा स्वीकारलं आणि बस्स आता आपण स्वतःच्या प्रेमात पडलो असं होत नाही. तुमचं दुसऱ्याशी असलेलं ना...