आरोग्याला हितकारक असे हे चहाचे प्रकार कधी ट्राय केले आहेत का?

पावसाळा सुरु झाला आहे आणि अशा या थंड मौसमात जास्त आठवण येते ती म्हणजे चहाची. पावसाळ्यात पिला जाणारा हा चहा थोडा आयुर्वेदिक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा असेल तर मग काय मज्जाच!

पावसाचा हा ऋतू हवाहवासा असला तरी या ऋतूमध्ये पावसासोबतच काही आजारही आपला पिच्छा पुरवतात. या दिवसात सर्दी, ताप, पडसे अशा किरकोळ आजारासोबतच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे काही गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी विशेषत: सर्दी/पडसे/खोकला अशा किरकोळ आजारापासून सुटका मिळावी म्हणून आम्ही इथे चहाचे काही खास प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहोत ज्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही सुधारेल आणि मूडही!

lokmat.com


१)तुळस-आले चहा (Ginger-basil leaves tea/tulas-aale chaha) –

एका भांड्यात तीन कप पाणी घ्या. त्यात एक चमचा खिसलेले आले टाका. त्यानंतर १०-१२ तुळशीची पाने टाका. ५ मिनिटासाठी हे मिश्रण उकळा. उकळून झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि चहा सर्व्ह करा. चहाला थोडी गोडी येण्यासाठी एक चमचा मध देखील मिसळू शकता.

हा चहा तुमची पचनशक्ती सुधारण्यात मदत करेल.

२) ओवा-जीरा चहा (cumin-ajwain tea)

एक कप पाण्यात एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा टाकून हे पाणी उकळून घ्या. उकळल्यानंतर हा चहा गळून घ्या. चवीसाठी यात एक चमचा मध किंवा लिंबू रस टाकून पिऊ शकता.

 

दररोज सकाळी काही खाण्यापूर्वी जर हा चहा घेतला तर, तुमचे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

३) बडीशेप चहा – (Fennel tea)

बडीशेपाचे दाणे कुटून घ्या. उकळलेल्या पाण्यात हे कुटलेले बडीशेप टाकून थोडा वेळ झाकून ठेवा. दहा मिनिटांनी हे पाणी गाळून घेऊन हा चहा पिऊ शकता.

विशेष म्हणजे मुखदुर्गंधी, छातीची जळजळ कमी करण्यासाठीही तुम्हाला हा चहा उपयोगी ठरेल.

४) आयुर्वेदिक चहा – (ayurvedic tea)

दालचिन, बदाम फूल, लवंग, वेलदोडे, तमालपत्र, काळी मिरी यांची एकत्र भुकटी करून चहा करताना याचा वापर करू शकता. हा आयुर्वेदिक चहा मसाला, सर्दी खोकल्यापासून तर बचाव करेलच शिवाय चहाची चवही वाढेल.

५) हळद आणि काळी मिरीचा चहा- (turmeric-black paper tea)

थंडीच्या दिवसात घशाची खवखव होणे ही एक सामान्य समस्या आहे. अशावेळी हळद आणि काळी मिरी टाकून केलेला चहा पिल्याने तुम्हाला आराम पडेल. शिवाय, हळदीमुळे त्वचेचा रंग देखील उजळेल.

एक कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरेपूड टाकून उकळून घ्या आणि गाळून प्या.

maharashtratimes.com


६) ज्येष्ठमधाचा चहा- (Jyeshthmadh/Mulethi)

एक कप पाण्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमध पावडर टाकून उकळा. यात चवीसाठी एक चमचा मध मिसळा. नंतर हा चहा गळून प्या. सर्दी झाली असेल तर हा चहा तुम्ही वारंवार पिऊ शकता. ज्येष्ठमधाने कफ आणि सर्दी दोन्हीत आराम मिळतो.

थोडक्यात काय,

चहा प्या आणि तंदुरस्त रहा!!


मेघश्री श्रेष्ठी

Post a Comment

0 Comments