विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमुल्य योगदान देणाऱ्या डॉ कमल रणदिवे
आज विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही भारतीय महिला उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. विज्ञान आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भारतीय महिलांची वाट सुकर व्हावी म्हणून इतिहासात काही महिलांनी आपले योगदान दिले आहे आणि त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ कमल रणदिवे. आज त्यांची १०४वी जयंती आहे आणि त्यांच्या या शतकोत्तर जयंती दिनाचे औचित्य साधून गुगलने आजचे डूडल त्यांना समर्पित केले आहे. डॉ कमल रणदिवे यांनी स्तनाच्या कॅन्सर संदर्भात महत्वपूर्ण संशोधन केले. त्यांच्या या संशोधन कार्यासाठी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याकाळी विज्ञान क्षेत्रात महिलांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती. विज्ञान क्षेत्रात महिलांनाही वाव मिळावा म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन भारतीय महिला वैज्ञानिक संघ स्थापन केला. या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. विज्ञान आणि शिक्षण यांच्या सहाय्याने समाजात समानता प्रस्थापित केली जाऊ शकते असे त्यांचे मत होते, याच उद्देशाने त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात काम केले. या संस्थेतर्फे खास महिलांसाठी ११ कॉलेजस चालवले जातात आणि महिलांना संशोधन का...