सबसे बडा रूपय्या-२

पैशाने आनंद विकत घेता येत नाही हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे, की पैशशिवाय आनंदीही राहता येत नाही. पैसा सर्वस्व नसला तरी, आवश्यक तरी नक्कीच आहे. पैशाची उणीव किंवा आवश्यक तितका पैसा हातात नसेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा होतात ही आपण सर्वचजण अनुभवत असतो.

 

Image source : Google

पैशाबद्दल आपण चुकीच्या भावना किंवा गैरसमज बाळगल्याने आपल्यापासून पैसा कसा दूर जातो ही आपण मागच्या लेखात पहिलंच आहे. मग हवा तितका पैसा मिळवायचा असेल तर काय करावं लागेल. तर त्यासाठी आधी विश्वास ठेवावा लागेल की, आपल्याला हवा तितका पैसा या जगात उपलब्ध आहे आणि तो आपल्यालाही मिळणार आहे.

 

आपल्याला पैसा मिळणार आहे हा विश्वास ठेवून तुम्ही फक्त ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणत बसायचं नाहीये. तर त्यासाठी तुम्ही जे काम करू शकता, जे कष्ट करू शकता जे प्रयत्न करू शकता तेही करायचेच आहेत. फक्त विश्वास ठेवून नाही तरी विश्वासाने प्रयत्न करूनच आपल्याला आपले इच्छित ध्येय साध्य करता येतं एवढं लक्षात ठेवा.

 

एक मुलगा होता ज्याला कॉमेडी करण्याची खूप आवड होती. त्याचे वाडीलही उत्तम विनोद वीर होते, पण त्यांनी कधीच आपली दीड-दमडीची नोकरी सोडून कॉमेडी शो करण्याचे धाडस केले नाही. आपल्याला या क्षेत्रात यश मिळेल याची त्यांना खात्रीच नव्हती त्यामुळे त्यांनी मन मारून आयुष्यभर तीच नोकरी केली ज्यात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते.

 

पण त्यांनी आपल्या मुलाला कॉमेडियन होण्यास प्रोत्साहित केले आणि त्यासाठी त्याला मदतही केली. कॉमेडियन होण्याची इच्छा ठेवून घरातून बाहेर पडलेल्या या मुलाला त्याच्या शोमुळे प्रेक्षकांचा मारही खावा लागला होता. पण त्याने कॉमेडियन होण्याचे स्वप्न काही सोडले नाही.  खिशात दहा डॉलर्स नसतानाही तो एक कोटी डॉलर्सचा चेक घेऊन फिरत असे, कशासाठी? तर त्याला एकदिवस आपल्या कामासाठी एक कोटी डॉलर्सचा चेक मिळणार हा विश्वास होता. दहा वर्षे खडतर संघर्ष केल्यानंतर आपल्या एका शोसाठी एक कोटी डॉलर्सचा चेक घेण्याचे त्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले. फक्त कॉमेडियन म्हणूनच नाही तर आज जग त्याला स्टार कॉमेडियन म्हणून ओळखते, या मुलाचे नाव होते, जीम कॅरी.

 

ही गोष्ट सांगण्याचे प्रयोजन इकतेच की पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरतात यावर तुमचं विश्वास बसावा.

 

तुम्हाला तुमच्या खिशात/तुमच्या अकाऊंट वर किती पैसे हवेत, ही तुम्ही ठरवू शकता आणि ते सत्यात उतरवू शकता. आपलय प्रत्येक इचचेत मूर्त रूप धरण करण्याची शक्ती असते फक्त ती शक्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे.

                                                                                              

दहा ते सात पर्यंत नोकरी केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणारच नाहीत अशा धारणातून कित्येक जण स्वतःला त्याच रुटीन शेड्यूलशी बांधून घेतात. अशीच कित्येक वर्षे गेल्यानंतर कळते की अरे इतकी वर्षे तर आपण घण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे फक्त कामच करत आलो. फक्त काम आणि काम करत आपण कितीतरी आनंदमयी क्षणांचा त्याग केला, आपली आवड-निवड कायम नाकारली.

 

पैशाचा गुलाम होण्यापेक्षा त्याचा मित्र होणे कधीही चांगलेच ना? पैसा हा आपला एक असा मित्र आहे जो आपल्या चांगल्या-वाईट सर्व प्रकारच्या काळात आपल्याला साथ देतो. त्याची ही साथ अपेक्षित असेल तर दडपण, भीती, चिंता, लोभ, अशा सगळ्या नकारात्मक भावनांचा त्याग करून पैशाकडे पाहण्याक सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.

 

विश्वास ठेवा या जगात तुम्हाला हवे ते आणि हवे तितके मिळू शकते फक्त आपला हेतू स्वच्छ हवा.

 

आपल्या विचारांवरच आपले वास्तव जीवन अवलंबून आहे. म्हणून आपल्या विचारांशी स्वप्नांशी प्रामाणिक रहा. आपण स्वतःच स्वतःसाठी नरक किंवा स्वर्ग बनवू शकतो. आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य तर सर्वानाच हवे आहे, त्यासाठी आपल्या यातील उर्जेचा वापर करावा लागेल. आपण हा उर्जेचा स्त्रोत २४ तास आपल्यासोबतच घेऊन फिरत असतो फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. इथून पुढे याची जाणीव करून ती जाणीवपूर्वक उपयोगात आणण्याचा संकल्प करूया.  

 

 

 

Post a Comment

0 Comments