ध्यान करण्यासाठी गंभीर होण्याची काय गरज?

ध्यान, मेडिटेशन, माइंडफुलनेस किंवा जागरूकता असे शब्द वाचनात किंवा ऐकण्यात आले तर आपल्याला वाटते की यासाठी आपल्याला खूपच गंभीर होऊन जगावं लागेल किंवा यागोष्टी म्हणजे एक फार मोठे गूढ आहे. अर्थात या गोष्टी सहज शक्य नाहीत असा आपला समज असल्याने आपल्याला असे वाटते की, ध्यान करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी खास वेळ काढावा लागतो आणि अशा व्यक्तिमध्ये खूप मोठा बदल होतो.

 

Image Source : Google

तुम्हालाही असे वाटत असेल तर, हा एक गैरसमज आहे. मेडिटेशन म्हणजे खूप काही गंभीर प्रकार नाही. अगदी रोजची दैनंदिन कामे करता करताही आपण मेडिटेशन करू शकतो. असं मी नाही तर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता रसेल ब्रॅंडचे मत आहे.

 

त्याच्या मते मेडिटेशन केल्याने आणि माइंडफुलनेसचा सराव केल्याने, मनात येणारे विचार आणि भावना यांच्याकडे तटस्थतेने पाहण्याची कला मिळाली.

 

माइंडफुलनेसचा हसतखेळत सहजतेने अनुभव कसं घ्यावा ही संगण्यासाठी त्याने स्वतःचा पॉडकास्ट सुरू केला आहे.

माइंडफुलनेस किंवा मेडिटेशनल सुरुवात केल्याने आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवता येतो. बाहेरच्या कोलाहलातही शांतता मिळते. त्यामुळे आपला ताणतणाव कमी होतो, असे ब्रॅंड म्हणतो. श्वासोच्छवासाच्या काही पद्धती वापरुन मनातील गोंधळ शांत करता येतो. या पद्धतींचा जर सराव झाला तर हे काम आणखीनच सोपे होऊन जाते.

नकारात्मक दृष्टी कमी करून एखाद्या गोष्टीची सकारात्मक बाजू लक्षात घेण्यास याचा फायदा होतो. तुम्ही कधीही आणि कुठूनही सुरुवात करू शकता. यामुळे रक्तदाबाच्या तक्रारी कमी होतील. निद्रनाश नाहीसा होतो. पचनाचे विकार किंवा पचनासंबंधी काही त्रास असतील तर ते कमी होतात.

 

 ‘Above the Noise with Russell Brand’

  या पॉडकास्टवर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. इथे तुम्हाला मेडिटेशन आणि माइंडफुलनेसशी संबंधित गोष्टींवर मार्गदर्शन मिळेल तेही रसेल ब्रॅंड कडून.

 

ध्यान, माइंडफुलनेस, मानसिक स्वास्थ्य या संबंधित तुमच्या ज्या काही शंका असतील त्याची उत्तरेही तुम्हाला इथे मिळतील.

 

तणावमुक्त, स्वस्थ, मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

 

Comments

Popular posts from this blog

नात्यातील Red flags म्हणजे काय? Red flags कसे ओळखायचे? Red flags असणारे नाते टिकवायचे का?

भूतकाळाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका कशी कराल?

किस करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत?/Benefits Of Kissing