पुनीत काळाच्या पडद्यावर ठसा उमटवणारा 'रिअल हिरो'!
काल दुपारी ती बातमी धडकली आणि धक्काच बसला. अवघ्या ४६ व्या वर्षी कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू. पहिल्यांदा कू मराठी अॅपवर जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा विश्वासच बसला नाही. अशीच अफवा असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर विवध न्यूज चॅनेल्सवरूनही जेव्हा ही बातमी प्रसारित होऊ लागली तेव्हा मात्र मन सुन्न झाले. पुनीथ राजकुमारच्या जाण्याने संपूर्ण कन्नड चित्रपट सृष्टी दु:खाच्या खाईत लोटली गेली आहे. त्याच्या अशा अवचित जाण्याच्या बातमीने त्याच्या दोन चाहत्यांचाही हृद्यविकाराने मृत्यू झाला आहे तर एका चाहत्याने आत्महत्या ऐकल्याचे समजते. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही ही बातमी पचवणे खूप अवघड गेले असणार. फिटनेस , अॅक्टिव्हनेस आणि दानशूरता यासाठी ओळखला जाणारा पुनीत असा जाऊ शकतो हेच मुळी अविश्वसनीय! मरणानंतरही तो आपले दोन्ही डोळे मागे ठेवून जातोय. ( त्याचे वडील, सुपरस्टार डॉ. राजकुमार यांनीच १९९४ सालीच आपल्या कुटुंबातील सर्वांनीच नेत्रदान करावे अशी तरतूद केली आहे.) एक कलाकार म्हणून तर तो ग्रेट होताच पण माणूस म्हणूनही तो...