शत्रू तर खूप असतील पण तुम्ही स्वतःचे मित्र व्हा!
बुद्ध म्हणतात, स्वतःशिवाय आपल्याला दुसरे कोणीही वाचवू शकत नाही. बुद्धाच्या विचारातील ही सत्यता जगण्यात उतरवायची असेल तर आपल्याला स्वतःचाच मित्र बनता आलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे आणि स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतःशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे कारण, एक मित्रच दुसऱ्या मित्राला समजून घेऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो आणि खरा मार्ग दाखवू शकतो. एक मित्र आपल्याला उभारी देतो, आपल्यात अशा निर्माण करतो, आपल्या पाठीशी ठामपणे उभा असतो. या सगळ्या गोष्टी कुणी मित्र जर आपल्यासाठी करत असेल तर आपणच आपल्यासाठी का नाही करू शकत? स्वतःशीच पक्की मैत्री झाली तर आयुष्य म्हणजे एक अद्भुत नि रम्य प्रवास बनून जाईल. आपल्याशीच मैत्री कशी करायची हे पाहण्याआधी एका चांगल्या मित्रात कोणते गुण आवश्यक असतात ते आधी पाहूया. चांगला मित्र तो असतो जो आपली बाजू घेतो, आपला आदर करतो, आपल्याला सामावून घेतो, ज्याला आपली गरज असते, जो आपल्याशी मैत्री करण्यायोग्य असतो आणि आपल्या पाठीशी कायम उभा असतो. तुमचे भले व्हावे असे त्याला आतून वाटत असते. तुम्हाला प्रोत्साहन देण्यात, तुम्हाला ऊर्जा देण्यात त्याला क...