शत्रू तर खूप असतील पण तुम्ही स्वतःचे मित्र व्हा!
बुद्ध
म्हणतात, स्वतःशिवाय आपल्याला दुसरे कोणीही वाचवू शकत नाही. बुद्धाच्या विचारातील
ही सत्यता जगण्यात उतरवायची असेल तर आपल्याला स्वतःचाच मित्र बनता आलं पाहिजे.
स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे आणि स्वतःचा स्वीकार करता आला पाहिजे. स्वतःशी
मैत्री करणं खूप गरजेचं आहे कारण, एक मित्रच दुसऱ्या मित्राला समजून घेऊ शकतो,
प्रोत्साहन देऊ शकतो आणि खरा मार्ग दाखवू शकतो.
एक
मित्र आपल्याला उभारी देतो, आपल्यात अशा निर्माण करतो, आपल्या पाठीशी ठामपणे उभा
असतो. या सगळ्या गोष्टी कुणी मित्र जर आपल्यासाठी करत असेल तर आपणच आपल्यासाठी का
नाही करू शकत?
स्वतःशीच
पक्की मैत्री झाली तर आयुष्य म्हणजे एक अद्भुत नि रम्य प्रवास बनून जाईल. आपल्याशीच
मैत्री कशी करायची हे पाहण्याआधी एका चांगल्या मित्रात कोणते गुण आवश्यक असतात ते
आधी पाहूया.
चांगला
मित्र तो असतो जो आपली बाजू घेतो, आपला आदर करतो, आपल्याला सामावून घेतो, ज्याला
आपली गरज असते, जो आपल्याशी मैत्री करण्यायोग्य असतो आणि आपल्या पाठीशी कायम उभा
असतो. तुमचे भले व्हावे असे त्याला आतून वाटत असते. तुम्हाला प्रोत्साहन देण्यात, तुम्हाला
ऊर्जा देण्यात त्याला कमीपणा वाटत नाही. मग आपल्यालाही एखाद्याचा चांगला मित्र
किंवा मैत्रीण व्हायचे असेल तर हे गुण आपल्यातही हवेतच.
१)
आयुष्य म्हणजे एक सोहळा आहे, त्याचा आनंद घ्या –
तुमच्या
आयुष्यात एखादी चांगली घटना घडली तर सर्वात जास्त आनंद होतो तो तुमच्या मित्राला.
तसाच आनंद तुम्हालाही झाला पाहिजे. अगदी छोटीशी गोष्ट पण ती जर तुमच्या भल्याची
असेल तर त्यासाठी तुम्ही आनंदी व्हायला हवे. आयुष्यात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत
नाही. त्यामागे काही ना काही कारण असते, आता प्रत्येक गोष्टी मागील कारण शोधण्याऐवजी
आपण फक्त एवढेच म्हणायचे की, जे झाले ते चांगले झाले आणि जे होणार तेही चांगलेच
होणार. आयुष्यात सगळ्याच प्रकारच्या घटनांची सरमिसळ आहे, त्यामुळे अधिकाधिक आनंदी
जगण्यासाठी आशावादी राहणं खूप महत्वाचं आहे.
२)
स्वतःला मागे खेचणार की पुढे जायला प्रोत्साहित करणार –
कोण
आपल्याला काय म्हणेल या विचाराने सततच स्वतःला पारखत-निरखत बसलात तर आयुष्याचा
आनंद लुटण्याऐवजी तुम्ही किरेकिरे होऊन जाल. छोटा असो की मोठा आनंद साजरा करायला
शिका आणि तोही स्वतःसोबत. जगातील चांगल्या गोष्टी तेव्हाच मिळतात जेव्हा आपण
त्यासाठी पात्र असतो म्हणून स्वतःला चांगल्या गोष्टींसाठी सिद्ध करा. त्यासाठी
स्वतःसोबत चांगले वागा म्हणजे जगही तुमच्यासोबत चांगले वागेल.
दुख,
अपयश, तणाव, निराशा सगळ्यांकडे आहे. त्यातूनही आपण आशावादी राहायला शिकलं पाहिजे.
स्वतःला आशावादी राहायला प्रोत्साहित करणं म्हणजेच स्वतःचा मित्र बनणं. एक चांगला
मित्र हेच तर करत असतो. कधीही कुठल्याही टप्प्यावर हार मानू नका. अजून एक प्रयत्न
करायला काय हरकत आहे, हे स्वतःलाच समजावून सांगा.
काही
घटना जेव्हा मनाविरुद्ध घडतात तेव्हा आपण नकारात्मक बनत जातो. तेव्हा स्वतःचा एक
चांगला मित्र बनून स्वतःला सकारात्मक विचार शोधण्यास आणि त्यावर फोकस करण्यास
प्रवृत्त करा. आपल्याला कुणीतरी मार्ग दाखवेल कुणी तरी प्रोत्साहन देईल, अशी वाट
पाहण्यापेक्षा, स्वतःच स्वतःची ताकद बना.
३)
न्यूनगंड बाळगण्यापेक्षा स्वतःतील चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी
स्वतःला अधिक प्रोत्साहन द्या-
चांगला
मित्र कधीही तुम्हाला कमी लेखत नाही. तो कधीही तुम्ही नाराज व्हाल किंवा तुमच्यात न्यूनगंड
निर्माण होईल अशी टिप्पणी करत नाही. तो नेहमी तुम्हाला तुमच्यातील चांगल्या
गुणांवर फोकस करायला लावतो. तुमच्यात सुधारण्याला कुठे वाव आहे हे सांगतो. तसेच
एका चांगल्या मित्राप्रमाणे स्वतःला अधिकाधिक इम्पृव्ह करण्यावर भर द्या. स्वतःला
कमी लेखणारे, न्यूनगंड वाढवणारे विचार सोडून द्या. स्वतःचा आवाज, शरीर, भूतकाळ,
अशा गोष्टी उकरून काढून स्वतःवर टीका करू नका.
तुम्हाला
टीकाकारांची नाही तर पाठबळ देणाऱ्यांची गरज आहे. तेव्हा स्वतःच स्वतःचे टीकाकार
होऊ नका. तुम्ही इतरांना त्याच्या दिसण्यावरून, कपड्यावरून, चालण्यावरून, खाण्यापिण्याच्या
सवयीवरून चिडवाल का? किंवा असे कुणी तुमच्याबाबतीत केले तर तुम्हाला आवडेल का? मग
हेच स्वतःच्या बाबतीतही करू नका.
४)
चुकतो तो शिकतो –
आपण
कितीही प्रयत्न केले तरी कुठे ना कुठे कधी ना कधी चुका या होणारच. तशा त्या
सर्वांकडून होतात. कोणीही अगदी परिपूर्ण नाही. त्यामुळे स्वतःतील अपूर्णता
स्वीकारा. मला हे करता येत नाही, ते करता येत नाही, असा विचार करून स्वतःला कुचकामी
ठरवू नका. जे काही येते आणि जितके येते त्याबद्दल स्वतःचे कौतुक करा. किमान तुम्ही
प्रयत्न केलात म्हणून तरी तुम्ही स्वतःच्या कौतुकास पात्र आहातच.
चुका
शिवाय शिकता येतच नाही, म्हणून चुका म्हणजेच धडे हे लक्षात ठेवा. त्यासाठी स्वतःला
अपराधी समजण्याची गरज नाही. स्वतःला माफ करा आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी
सिद्ध व्हा.
५)
विश्वास ठेवा, स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या चांगुलपणावर –
स्वतःवर
विश्वास ठेवा. तुमचा चांगला मित्र नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवतो. स्वतःच्या
स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि यावरही विश्वास ठेवा की तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास
तुम्ही पात्र आहात. स्वतःच्या आयुष्यात जे बदल करून इच्छिता ते नक्की अंमलात आणा.
आपल्या क्षमतांवर, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवाआणि एक चांगला मित्र हे करतोच
करतो. म्हणून लक्षात ठेवा की, आपण आपले चांगले मित्र आहोत.
तुलना
करू नका. त्याला कसं जमलं! तिला किती छान जमतं! अशी तुलना करून स्वतःला कमी लेखू
नका. त्यांनी असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं अशा
टिप्पण्या देऊन इतरांनाही कमीपणा देऊ नका. तुमच्या चांगल्या मित्रानं किंवा
मैत्रिणीनं असं केलं असतं का तुमच्याशी. तुम्हाला हे नाही जमत, ते नाही जमत असा
सदा नन्नाचा पाढा वाचला असता का? आणि तो तुम्हाला सहन झाला असता का? नाही ना? मग
स्वतःसोबतही तसं वागू नका.
६)
ऐकून घ्यायला शिका –
चांगल्या
मित्राचा आणखी एक चांगला गुण म्हणतो तो आपलं ऐकून घेतो. तुम्ही तुमचं मनमोकळं
होईपर्यंत त्याच्याशी बोलत राहता आणि तो शांतपणे ऐकत राहतो. तसच स्वत:चंही ऐकून
घ्या. आता मला काय वाटतंय? मला नेमकं काय हवय? हे ऐकायला शिकलात तरच तुम्ही
स्वतःला समजून घ्याल. आपल्या इच्छा नेमक्या काय आहेत? आपली स्वप्नं नेमकी काय आहेत?
हे ऐकून घेतल्याशिवाय समजणार नाही. आपलं हृदय आपल्याला काही तरी सांगण्याचा
प्रयत्न करतंय.
सध्या
तरी इतकंच सांगायचं आहे की, किमान स्वतःशी तरी चांगलं वागा. आपण आपल्याशी चांगलं
नाही वागणार तर कोण वागणार? स्वतःसोबत कायम एक टीकाकार, इर्षा करणारा, पाठीमागे
खेचणारा मित्र ठेवायला आवडेल का तुम्हाला? नाही ना? मग स्वतःहूनच स्वतःसोबत असं
कसं वागू शकतो आपण? आपल्याला हे कळायला हवंय!
Comments