Posts

वटपौर्णिमा आणि सावित्रीचा वारसा

Image
फोटो गुगल वरून साभार  हॅप्पी वटपौर्णिमा’पासून ते ‘ह्योच नवरा सात जन्मी हवा दिवसाच्या’ शुभेच्छा सोशल मिडीयावर फिरताहेत. अर्थात त्या दरवर्षीच फिरतात, तसा हा काही नवा प्रकार नाही. काही जणांसाठी हा सांस्कृतिक अस्मिता जपण्याचा दिवस असतो तर काही जणांसाठी हा दिवस निव्वळ थट्टेचा विषय असतो. आता इकडच्या काही जणांत आणि तिकडच्या काही जणांत कुणाचा समावेश होतो हे सांगण्याची गरज नाही.  वटपौर्णिमे दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, तिच्या पातीव्रत्यात इतकी ताकद होती की, तिने आपल्या मृतप्राय पतीलाही जिवंत केले म्हणजेच अशक्य कोटीतील गोष्ट शक्य करून दाखवली. सावित्रीची ही कथा तुम्ही अनेकदा वाचली किंवा ऐकली असेल आज जरा नव्या दृष्टीने तिच्याकडे पाहूया.  युधिष्ठिराला द्रौपदी इतकी आपल्या पतींचा विचार करणारी (थोडक्यात काय तर पतिव्रता स्त्री) दुसरी कोणी स्त्री आहे का हा प्रश्न पडला होता. तेंव्हा युधिष्ठिराला मार्कंडेय ऋषींनी ही सावित्रीची कथा सांगितली,  भद्र देशाचा एका राजा होता ज्याचे नाव होते अश्वपती. या अश्वपती राजाला मुल नव्हते. अश्वपती राजाने अपत्य प्राप्तीसाठी होमहवन सा...

कोरा कागज -

Image
पोरांना जेवायला घालून त्यांना जबरदस्ती झोपवलं. आज खूप दिवसांनी मला प्यायची होती. कपाटातून बाटली काढली सोबत सगळा तामझाम घेऊन मी बसले. बसण्याआधी एकदा पोरांच्याकडे नजर टाकली खरंच त्यांना झोप लागली आहे की नाही बघितलं. दोघेही गाढ झोपेत आहेत याची खात्री पटली आणि मी बसले. चिकन सिक्स्टीफाय आणि सोबत रम. एकटीने पिण्यात काय मजा पण, असा विचार करत करत मी दोन पेग हाणले. आता डोळे जड झाले आणि आतून गुदगुल्या व्हायला लागल्या. खरं सांगू का... ह्या गुदगुल्या मला अजिबात सहन होत नाहीत. असलं काही हसू फुटतं की मला आवरता आवारत नाहीत. पण आता त्या आवरल्या शिवाय पर्याय नव्हता. मी हसत होते पण मोठमोठ्याने नाही गालातल्या गालात. डोळे अजून अजून जड होत जातील तस तस माझं मंद स्मित आणखी आणखी पसरत होतं. मध्येच मला काही तरी आठवू लागलं आणि आठवत आठवता चक्क दिसू पण लागलं. डोळे जड झालेच होते तरी पण जड झालेल्या पापण्या मी मुश्किलीने वर-खाली केल्या. समोर अजून अर्धा पेला भरलेला होता. उघड-झाप करत करतच मी पेला हातात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. पण हात पेल्यापर्यंत जायला किमान अर्धा मिनिट तरी लागलाच. शरीर असं स्लो मोशनवर येतं ना ...

का चिडलेत एमपीएससीवाले?

Image
Source : Google Image गेल्या वर्षभरापासून आपण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. कोरोनाच्या या संकटामुळे सामान्य लोक भरडले गेले आहेत. यातून स्पर्धा परीक्षेतून आपलं भविष्य घडवणारा विद्यार्थीवर्ग सुद्धा चुकला नाही. महाराष्ट्रातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या फारच कठीण होऊन बसल्या आहेत.  या कोरोना संकटात एमपीएससी वाल्यांची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली. वरून त्यात वयोमर्यादेची अट घालण्यात आली. एमपीएससीची परीक्षा ही एका दिवसाची नसते. ती पूर्ण वर्षभराची प्रक्रिया असते. आयोगाच्या एका परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जातात.  पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी मेहनत घेत असतात. वर्ष वर्षभर घरी जात नसतात. मात्र परीक्षाच लांबत असल्याने एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना कुठेतरी अडथळा निर्माण झालाय. एमपीएससी पास झालेल्यांच्या नियुक्त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडल्या आहेत.  मुलगी जर एमपीएससी करत असेल आणि तिथे काहीही कमी-जास्त झालं की तिच्या घरचे आधी लग्नाचं हत्यार बाहेर काढतात. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचं कारण द...

भारतीय वृक्ष दिन!

Image
source : Google Image   अलीकडच्या दिवसात आपल्या कानावर एक शब्द सातत्याने पडतोय तो म्हणजे ऑक्सिजन! तो ऑक्सिजन जो या कोरोना संकटात अनेकांना न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.  आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू ज्याचा मूलभूत स्त्रोत आपल्या पृथ्वीवरील वृक्ष आहेत. आज भारतात १५ मे ला  ' भारतीय वृक्ष दिन ' साजरा केला जातो.             पाणी हे जीवन असेल तर झाडे ही आपला श्वास आहेत हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. पण हा श्वासच विकासाच्या नावाखाली कधी तोडला जातो हे आपल्याला समजत नसतं. कधी समाजकंटक, कधी चैनीखोर लोक या झाडांची कत्तल करत असतात. कदाचीत त्यांना आज दवाखान्यात सहज उपलब्ध न होणाऱ्या ऑक्सिजनची किंमत कळाली नसावी. जगण्यासाठी माणूस वृक्षांवर अवलंबून असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तो वृक्षांपासून भागवत असतो. झाडांपासून इतकं सुख मिळवणारा माणूस आज मात्र दुर्दैवाने वृक्षांच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे.           पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामागे वाढती लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. कु...

भारतीय तंत्रज्ञान दिवस!

भारताने ११ मे १९९८ ला पोखरण येथे यशस्वी अणु चाचणी पूर्ण केली. आणि खऱ्या अर्थाने देशात तंत्रज्ञानाची क्रांती झाली. म्हणून सन १९९९ पासून देशात ११ मे ला ' राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ' साजरा केला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी भारताने 'ऑपरेशन शक्ती' या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली होती. त्याच बरोबर बंगळुरूच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या 'हंसा ३' या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली होती. शिवाय डीआरडीओ ने 'त्रिशूल' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं होतं. त्यामुळे ११ मे हा दिवस भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.           १९९५ मधे सुरु झालेल्या अनुचाचणीच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने ती चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर मात्र भारताने कोणतीही कसर सोडली नाही. अब्दुल कलाम आणि त्यांची टीम यांनी पोखरण स्थळाचा सखोल अभ्यास केला. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली ना...

कर्पूरगौरं करुणावतारं!

Image
“त्राही माम, त्राही माम,” करत राक्षसांच्या त्रासापासून बचावासाठी पळ काढणारे देवगण, हातात चिपळ्या घेऊन ‘नारायण, नारायण’ बोलणारे पण इकडचे तिकडे नि तिकडचे इकडे करून लावालावी करण्यातच धन्यता मानणारे नारदमुनी, शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले आणि देवी लक्ष्मीकडून सेवा करवून घेणारे भगवान विष्णू, कमळात विराजमान झालेले त्रिमुखी ब्रह्म, या सर्वांपेक्षा अंगाला भस्म फासलेला, विष प्यायल्याने नीलकंठ ठरलेला, गळ्यात साप आणि डोक्यावर गंगेचा भार वाहणारा, भोळा सांब सदाशिव मला जास्त प्रिय आहे. कृष्णाची राधा होण्याची कल्पना मला कधीच भावली नाही. पण, शिवाची पार्वती होण्याचा रोमँटिसिझम मला जास्त भावतो.   म्हणून माझा पहिला क्रश आहे तो महाशिव! सृष्टीचा तारणहार!   गुगलवरून साभार सांसारिक जीवनाचा पाया रचणारे शिव पार्वती हे पहिले दाम्पत्य मानले जाते. इतर देव आणि देव पत्न्या यांच्यापेक्षा शिव-पर्वतीची प्रेमकहाणी खूपच हटके आहे. शिवाचे सतीवरील प्रेम, तिच्या हट्टा पुढे विरघळणारे त्याचे कोमल हृदय आणि तिच्या विरहाने तापदग्ध झालेला तांडव करण्यास उद्युक्त झालेला शिव. शिवाची ही सगळी रूपे विलोभनीय वाटतात. ...

मी झाडावर उगवलो असतो तर!

Image
  त्या दिवशी मी प्रेमला सांगत होते, “बाहेर जाऊ नको खेळायला. ऊन आहे , झाडावर चढू नको पडशील , सारखं सारखं बाहेर राहू नये/खेळू नये, कोरोना आहे,” इत्यादी इत्यादी इत्यादी. माझी कॅसेट सुरू होती. ‘हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको.’ माझं हे बोलणं ऐकून तो वैतागला. तो रडत म्हणाला, “का जाऊ देत नाही मला बाहेर तू? मला खेळायचं आहे. मला कळतंय कशी काळजी घ्यायची स्वतःची. किती किरकिर लावते. तुला होण्यापेक्षा एखाद्या झाडावर उगवलो असतो, किती बरं झालं असतं.”   त्याच्या या वाक्यानंतर मला धक्का बसला. मी शांत बसले. तो जेवायला लागला. त्याचं जेवण होईपर्यंत मी त्याला काहीही बोलले नाही आणि जेवण केल्यानंतरही नाही. त्या क्षणी माझ्यासमोर फक्त चांदण्या नाचत होत्या. माझ्या लेकानेच मला दिवसा चांदण्या दाखवल्या होत्या. आता या वेळी माझ्याजवळ दोन पर्याय होते. एक मी स्वतःला भावनिक त्रास करून घ्यावा, माझा मुलगा असं कसं बोलू शकतो? त्याला माझा वीट कसा येऊ शकतो? माझी काळजी त्याला कळत कशी नाही?, वगैरे वगैरे वगैरे. किंवा मी घडल्या प्रकाराची दुसरी बाजू बघण्यासाठी स्वतःला वेळ देऊ शकत होते. पहिलं मी स्वतःला ...